आत्महत्येची धमकी देताना गमावला जीव
By Admin | Updated: January 14, 2017 01:52 IST2017-01-14T01:52:33+5:302017-01-14T01:52:33+5:30
कॉलेज आणि क्लासमध्ये जाऊन उशिरा घरी आल्याबद्दल रागे भरणाऱ्या आई-वडिलांनीसंतापणे थांबवावे, यासाठी धमकीवजा गळफास

आत्महत्येची धमकी देताना गमावला जीव
बंगळुरू : कॉलेज आणि क्लासमध्ये जाऊन उशिरा घरी आल्याबद्दल रागे भरणाऱ्या आई-वडिलांनीसंतापणे थांबवावे, यासाठी धमकीवजा गळफास लावून घेतलेल्या एका विद्यार्थिनीस खरोखरचच जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री बंगळुरू शहरात घडली.पोलिसांनी सांगितले की, शहराच्या ब्याटरायणपूरा भागात राहणाऱ्या रमेश नावाच्या एका छोट्या व्यापाऱ्याच्या कुटुंबावर हे अरिष्ट आले. कीर्तना ही त्यांची १८ वर्षांची मुलगी म्हैसूर रोडवरील एका खासगी महाविद्यालयात शिकत
असे व कॉलेज संपले की क्लासलाही जात असे. बुधवारी रात्री कीर्तनाला कॉलेज व क्लास करून घरी यायला नेहमीपेक्षा उशीर झाला. काळजीने वाट पाहणाऱ्या आई-वडिलांनी ती घरी येताच तिला फैलावर घेतले. कीर्तना हिने उशीर का झाला याचे कारण सांगितले. पण तरीही आई-वडिलांनी भुणभूण सुरूच ठेवली. बराच वेळ पालकांची कुरकुर सुरूच राहिल्याने कीर्तना वैतागली व आता गप्प बसला नाहीत तर मी आत्महत्या करीन, अशी धमकी देत ती बाजूच्या खोलीत गेली. आई-वडिलांवर परिणाम व्हावा यासाठी तिने छताच्या पंख्याला ओढणी बांधून गळफास तयार केला व त्यात मान अडकवली. अर्थात खरा फास लावून घेण्याचा तिचा इरादा नव्हता. पण ती काय करते आहे हे पाहण्यासाठी दरवाजात येऊन उभे राहिलेल्या आई-वडिलांनी दरडावल्यावर ती एकदम दचकली आणि तिच्या पायाखालचे स्टूल सरकून फासाची गाठ घट्ट आवळली गेली. (वृत्तसंस्था)