धमकी देऊन केली शेतीची रजिस्ट्री
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:04+5:302015-02-18T00:13:04+5:30
धमकी देऊन केली शेतीची रजिस्ट्री

धमकी देऊन केली शेतीची रजिस्ट्री
ध की देऊन केली शेतीची रजिस्ट्री नागपूर : धमकी देऊन दुसऱ्याची शेती आणि प्लॉटची आपल्या नावाने रजिस्ट्री करणाऱ्या पाच आरोपींविरुद्ध गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.विजयलक्ष्मी अशोकराव लोहकरे (४१) रा. गणपतीनगर, प्लॉट नं. ६६, गोधनी रोड, झिंगाबाई टाकळी यांची सावरमेंढा येथे शेती आणि १५०० चौरस फूटांचा प्लॉट आहे. विजयलक्ष्मी यांची परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांनी आरोपी रमेश विनायक पोटभरे (४०), नरेंद्र खंडुजी चांभारे (४०) रा. डोये ले आऊट, पुरुषोत्तम गंगाधर भगतकर रा. गोळीबार चौक, टिमकी, अभय विनायक सावरकर रा. पांडे ले आऊट, खामला, भीमराव मलकाय रा. सावरमेंढा यांच्याकडून १० टक्के व्याजाने ५ लाख रुपये घेतले. आरोपींनी त्यांच्या संपत्तीचे मूळ कागदपत्र धमकावून जबरदस्तीने आपल्याकडे गहाण ठेवले. विजयलक्ष्मी यांनी आरोपींना १८ लाख रुपये व्याजासह परत केले. परंतु आरोपींनी जबरदस्तीने त्यांची शेती, प्लॉट आपल्या नावाने रजिस्ट्री करून घेतला. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.