विराट कोहली दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 11:19 AM2019-10-29T11:19:18+5:302019-10-29T11:22:57+5:30

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबाच्या हिटलिस्टवर

threat to virat kohlis life from terrorists of lashkar e taiba | विराट कोहली दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनं खळबळ

विराट कोहली दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनं खळबळ

Next

नवी दिल्‍ली: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबा ही दहशतवादी संघटना कोहलीला जीवे मारण्यासाठी कट रचत असल्याचं वृत्त 'एबीपी न्यूज'नं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची नावंदेखील ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबाच्या हिटलिस्टवर आहेत. 

भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानकडून ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबा या नव्या दहशतवादी संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेनं तयार केलेली हिटलिस्ट भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे. याबद्दलची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेला देण्यात आली आहे. यानंतर तपास यंत्रणेनं ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबाची पाळमुळं खणून काढण्यास सुरुवात केली आहे. 

ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबाच्या हिटलिस्टमध्ये अनेक प्रख्यात व्यक्तींच्या नावांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, सरसंघचालक मोहन भागवत, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने दिली आहे. 

Web Title: threat to virat kohlis life from terrorists of lashkar e taiba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.