पीडित मुलीच्या पित्याला जिवे मारण्याची धमकी
By Admin | Updated: March 21, 2016 02:39 IST2016-03-21T02:39:06+5:302016-03-21T02:39:06+5:30
आसारामबापूकडून लैंगिक अत्याचाराला बळी ठरलेल्या मुलीच्या पित्याला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आसारामबापूविरुद्धचा खटला मागे घेतला नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील

पीडित मुलीच्या पित्याला जिवे मारण्याची धमकी
शहाजहाँपूर : आसारामबापूकडून लैंगिक अत्याचाराला बळी ठरलेल्या मुलीच्या पित्याला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आसारामबापूविरुद्धचा खटला मागे घेतला नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी एका अज्ञात इसमाने मुलीच्या पित्याला दिली.
‘आसारामबापूविरुद्धचा खटला मागे घेण्यासाठी काल मला काही लोकांनी फोन करून धमकी दिली. खटला मागे घेतला नाही तर तुम्हाला ठार मारण्यात येईल, असे फोन करणाऱ्यांनी धमकावले,’ अशी माहिती पीडित मुलीच्या पित्याने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत दिली आहे.