शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

"नितीश कुमारांनी भाजपापासून लांब राहावे, अन्यथा बॉम्बने उडवून देऊ", डीजीपींच्या फोनवर धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 10:27 IST

डीजीपी आरएस भट्टी यांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲप मेसेज आणि ऑडिओ क्लिप पाठवून ही धमकी देण्यात आली आहे.

Nitish Kumar (Marathi News) पाटणा : बिहारमध्ये नवे सरकार स्थापन झाल्यापासून काही घडामोडी सुरु आहेत. यातच बिहारचे डीजीपी आरएस भट्टी यांना फोनवर धमकी आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपापासून लांब राहावे, अन्यथा त्यांना बॉम्बने उडवून देऊ आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना ठार मारू, असे म्हटले आहे. 

डीजीपी आरएस भट्टी यांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲप मेसेज आणि ऑडिओ क्लिप पाठवून ही धमकी देण्यात आली आहे. यावर, बिहार पोलिसांनीही तातडीने कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी तपासानंतर आर्थिक गुन्हे शाखेने कर्नाटकात छापेमारी करून आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पथक बुधवारी रात्री उशिरा आरोपीसह पाटणा येथे पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. 

दरम्यान, 28 जानेवारी रोजी नितीश कुमार यांनी महाआघाडी सोडली होती आणि त्यांच्या जुन्या आघाडी एनडीएसोबत सरकार स्थापन केले होते. यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 12 जानेवारी रोजी 243 सदस्यांच्या विधानसभेत बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 122 ऐवजी 129 आमदारांचा पाठिंबा मिळवून एनडीए सरकारसाठी विश्वासदर्शक ठराव जिंकला होता. मात्र, नितीश कुमार महाआघाडी सोडून भाजपामध्ये दाखल झाल्यामुळे अनेक प्रकारचे नाराजी पाहायला मिळत आहे.

नितीश कुमारांच्या निर्णयावर जेडीयूमध्ये नाराजी!नितीश कुमार यांनी महाआघाडी सोडून भाजपामध्ये प्रवेश केल्याने जेडीयू आणि भाजपामधील अनेक नेत्यांमध्ये नाराजी आहे. यानुसार, जेडीयूचे डॉ.संजीव, विमा भारती आणि दिलीप राय यांच्यातील नाराजी सर्वश्रुत झाला आहे. याशिवाय, इतर अनेक आमदारांनीही नितीश कुमार यांच्या एनडीएमध्ये जाण्याच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला होता. त्यात गोपाल मंडल, मनोज यादव असे आमदारही आहेत. तसेच रश्मी वर्मा, भागीरथी देवी आणि मिश्रीलाल यादव यांची बंडखोरी सुद्धा बिहार भाजपामध्ये दिसून आली. मात्र, त्यांची नाराजी इतर कारणांमुळे असल्याचे बोलले जात असले तरी नितीश कुमार यांनी भाजपासोबत सरकार स्थापन केल्यानंतर हे सर्व समोर येऊ लागले आहे. त्यामुळे नितीश कुमार यांना सहजासहजी सरकार चालवणे सोपे नाही, हे उघड होत आहे.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहार