शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

Coronavirus: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम; ३ महिने खबरदारी घेणं गरजेचं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 05:24 IST

Coronavirus in India: महाराष्ट्रात १५ टक्के रुग्ण, ६२ जिल्ह्यांत नवीन रुग्ण आढळण्याचा दर ५ टक्क्यांहून अधिक आहे. यात अरुणाचल प्रदेशातील ७ आणि  आसाममधील ५ जिल्ह्यांसह २८ जिल्ह्यांत हा दर ५ ते १० टक्क्यांदरम्यान आहे

ठळक मुद्देदेशभरात ७१ टक्के प्रौढांना एक डोस आणि २७ टक्के प्रौढांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.रशियातील स्थिती वाईट असल्याने स्पुटनिक लसीचे डोस कमी प्रमाणात मिळत आहेत.विषाणूचे नवे रूप शोधण्यासाठी ७० हजार नमुन्यांची तपासणी करण्याची क्षमता विकसित करण्यात आली

नितीन अग्रवालनवी दिल्ली :  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका अद्याप पुरता टळलेला नाही. नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी असले तरी सण, उत्सव आणि लग्नसराईमुळे पुढील तीन महिने अत्यंत सावधगिरी बाळगणे  जरूरी आहे, असे आवाहन सरकारने लोकांना केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, ६२ जिल्ह्यांत नवीन रुग्ण आढळण्याचा दर ५ टक्क्यांच्या अधिक धोकादायक पातळीपेक्षाही जास्त आहे. देशभरातील एकूण रुग्णसंख्या सध्या २.४४ लाख आहे. यापैकी महाराष्ट्रात ३६,७६७ आणि केरळमध्ये १.२२ लाख रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, देशातील एकूण रुग्णांपैकी केरळमध्ये ५०.७३ टक्के आणि महाराष्ट्रात १५.०६ टक्के रुग्ण आहेत. याशिवाय मिझोराममध्ये १६,६३७, कर्नाटकात ११,८४८ रुग्ण आहेत. 

मिझोराममध्ये नवीन रुग्ण आढळण्याचा दर सर्वाधिक २१.६४ टक्के आहे. केरळमध्ये १३.७२ टक्के आणि सिक्कीममध्ये १२.७६ टक्के लोकांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. या ठिकाणी धोका अजूनही कायम आहे. निष्काळजीपणा केल्यास रुग्णवाढीचा दर धोकादायक पातळी गाठू शकतो. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरदरम्यान नवरात्र, दसरा, दुर्गापूजा, दिवाळी, ईद आणि  नाताळ, तसेच नवीन वर्ष यासारखे सण, उत्सव साजरे होत नसल्याने हे तीन महिने अत्यंत सावधगिरी बाळगणे जरूरी आहे. आगामी सण, उत्सव  लोकांनी घरीच राहून ऑनलाइन साजरे करावेत, असा सल्लाही अग्रवाल यांनी दिला आहे. 

निति आयोगाने सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही.के. पॉल यांनी अमेरिका आणि ब्रिटनचे उदाहरण देत सांगितले की, धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासह लसीचे दोन्ही डोस घेणे  जरूरी आहे. झायडसच्या विनाइंजेक्शनची  लस देण्याचे प्रशिक्षण दिले जात असून, ही लस लवकरच देण्यास सुरुवात होईल. रशियातील स्थिती वाईट असल्याने स्पुटनिक लसीचे डोस कमी प्रमाणात मिळत आहेत. कोरोनाचा विषाणूच्या नवीन स्वरूपाबाबत त्यांनी सांगितले की, यावर सातत्याने लक्ष दिले जात आहे. विषाणूचे नवे रूप शोधण्यासाठी ७० हजार नमुन्यांची तपासणी करण्याची क्षमता विकसित करण्यात आली आहे. 

३४ जिल्ह्यांत रुग्णांचा दर १० टक्के६२ जिल्ह्यांत नवीन रुग्ण आढळण्याचा दर ५ टक्क्यांहून अधिक आहे. यात अरुणाचल प्रदेशातील ७ आणि  आसाममधील ५ जिल्ह्यांसह २८ जिल्ह्यांत हा दर ५ ते १० टक्क्यांदरम्यान आहे. केरळच्या १३, मिझोरामच्या ७ जिल्ह्यांसह ३४ जिल्ह्यांत हा दर १० टक्क्यांहून जास्त आहे. ९२.७७ कोटी लोकांना देशभरात लस देण्यात आली असून, यापैकी ६७.०२ कोटी लोकांना एक डोस आणि २५.७५ कोटी लोकांना दोन डोस देण्यात आले आहेत. देशभरात ७१ टक्के प्रौढांना एक डोस आणि २७ टक्के प्रौढांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या