शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

दरवर्षी हजारो विद्यार्थी अमेरिकेत पाठवा

By admin | Updated: January 31, 2016 00:45 IST

विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित (स्टेम) या महत्त्वाच्या क्षेत्रात पीएच.डी. करण्यासाठी दरवर्षी १० हजार भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेत पाठविले पाहिजे, असा सल्ला इन्फोसिसचे

बंगळुरू : विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित (स्टेम) या महत्त्वाच्या क्षेत्रात पीएच.डी. करण्यासाठी दरवर्षी १० हजार भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेत पाठविले पाहिजे, असा सल्ला इन्फोसिसचे सहसंस्थापक एन.आर. नारायणमूर्ती यांनी दिला आहे.यासाठी भारत आणि अमेरिका यांनी एक करार करावा आणि पुढील ५० वर्षांपर्यंत त्याची अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.बंगळुरू येथे इंडो-अमेरिकन चेंबर आॅफ कॉमर्स कॉन्क्लेव्ह २०२० मध्ये शुक्रवारी बोलताना त्यांनी हे विचार व्यक्त केले. ते म्हणाले की, यावर दरवर्षी ३३० अब्ज रुपये खर्च होईल; पण त्यातून होणाऱ्या फायद्याच्या तुलनेत तो फारच कमी राहील. हे विद्यार्थी विविध विभागांतील समस्यांवर एक अभिनव उपाय शोधतील. या विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पूर्ण केल्यानंतर त्यांना अमेरिकेत रोजगार मिळता कामा नये आणि भारतात परत येऊन कमीत कमी १० वर्षे भारतातच आपली सेवा देण्याची तरतूद या करारात स्पष्ट केलेली असावी. ते म्हणाले की, या व्यवस्थेमुळे अमेरिकेलाही फायदा होईल. समस्यांवर तोडगा काढणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठी असेल. त्यातून अमेरिकी शिक्षणतज्ज्ञांचे मूल्य आणखी वाढेल. भारत दरवर्षी अमेरिकेच्या शेकडो पदवीधर विद्यार्थ्यांना १० वर्षांचा बहुउद्देशीय प्रवेश व्हिसा देतो. या रणनीतीचा उद्देश ‘इंटरनेट आॅफ थिंग्स’ (आयओटी) यासारख्या क्षेत्रातील समस्या सोडविण्यात होईल. त्यातून भारतीय, अमेरिकी शिक्षणतज्ज्ञातील सहकार्य वाढेल. यातून निर्माण होणारी उत्पादने परस्परांशी संपर्क करतील आणि आपल्याबरोबर फोनवरून बोलतील. (वृत्तसंस्था)अमेरिकी कंपन्यांच्या मूल्यवर्धित भारताला भागीदार बनावे लागेलनारायणमूर्ती पुढे म्हणाले की, भारताला केवळ अमेरिकी कंपन्या नव्हेत, तर अमेरिकी कंपन्यांच्या ग्राहकांसाठीही आयओटीत अ‍ॅडव्हॉन्स्ड सॉफ्टवेअर विकसित करून अमेरिकी कंपन्यांच्या मूल्यवृद्धीत भारताला भागीदार बनावे लागेल. त्यासाठी आम्हाला आपल्या तरुणांना अ‍ॅडेक्टिव्ह कंट्रोल आणि अ‍ॅनालॉग टू डिजिटल आणि डिजिटल टू अ‍ॅनालॉग फ्रेमवर्क आणि डिजिटल डिव्हायसेसमध्ये प्रशिक्षण घ्यावे लागेल.भारतात विदेशी विद्यापीठांसाठी प्रवेश सोपा व्हावा म्हणून काहीही खास करण्यात आले नाही, असे सांगून ते म्हणाले की, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी विदेशी विद्यापीठांना प्रवेश देण्याची इच्छा व्यक्त केली होती; पण काही कारणास्तव त्यावर प्रगती होऊ शकली नाही.