शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

हिंदूंना धमकावणाऱ्या लोकांना पाकिस्तानात पाठवलं जाईल- बी. गोपालकृष्णन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 10:58 IST

काही लोक मध्यपूर्वेतील हिंदूंना नागरिकत्व कायद्याल समर्थन केल्यामुळे घाबरवले जात आहे.

नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीला समर्थन करणाऱ्या आखाती देशातील हिंदूना काही लोकं घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. हिंदूंना घाबरवाणाऱ्या आणि धमकावणाऱ्या लोकांना पाकिस्तानात पाठवलं जाईल असं विधान भाजपाचे नेते  बी. गोपालकृष्णन यांनी केलं आहे. 

बी. गोपालकृष्णन म्हणाले की, इंडियन यूनियन मुस्लीम लीगने (आययूएमएलन) धार्मिक घटकांना दूर केलं आहे. मात्र तरीदेखील काही लोक मध्यपूर्वेतील हिंदूंना नागरिकत्व कायद्याल समर्थन केल्यामुळे घाबरवले जात आहे. जे निरपराध हिंदूंना घाबरवत तसेच धमकावतात आहेत त्यांना पाकिस्तानात पाठवलं जाईल असं वक्तव्य बी. गोपालकृष्णन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केलं आहे.

केरळ सरकारने एनपीआरच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याच्या निर्णयावर बी. गोपालकृष्णन यांनी नाराजी व्यक्त केली. प्रत्येकाला देशात लागू केलेल्या सर्व कायद्यांचे पालन करण्याचे बंधन आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पी विजयन यांनी लवकरात लवकर एनपीआर प्रक्रिया सुरु करावी अन्यथा सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत राज्याला दिले जाणारे रेशन बंद होईल असं देखील बी. गोपालकृष्णन यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील कॅबिनेटनं राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला मंजुरी दिली होती. मात्र पश्चिम बंगाल आणि केरळ सरकारनं एनपीआरला त्यांचा विरोध असेल, हे आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरुन वादंग माजला असताना मोदी सरकार संपूर्ण देशात एनपीआर कसं राबवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीKeralaकेरळIndiaभारत