लखनऊः उत्तर प्रदेशमधल्या मुजफ्फरनगरमधल्या एका भाजपा आमदारानं वादग्रस्त विधान केलं आहे. भारतात ज्या लोकांना असुरक्षित वाटते, त्यांना बॉम्बनं उडवून दिलं पाहिजे, अशी मुक्ताफळे भाजपाचे मुजफ्फरनगरमधले आमदार विक्रम सैनी यांनी उधळली आहेत. परंतु हे माझं वैयक्तिक मत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. सैनी म्हणाले, मला व्यक्तिगतरीत्या वाटतं की, जे लोक सांगतात भारतात भीती वाटते किंवा ज्यांना भारतात असुरक्षित वाटते, त्यांना बॉम्बनं उडवून दिलं पाहिजे.माझ्याकडे एखादं मंत्रालय दिल्यास अशा सर्वच माणसांना मी बॉम्बनं उडवून देईन. कोणालाही सोडणार नाही. गेल्या काही दिवसांपूर्वीच अभिनेते नसिरुद्दीन शाह म्हणाले होते की, देशातील मुलांच्या मनात असुरक्षिततेची भावना आहे. बुलंदशहरमध्ये कथित गोहत्येच्या प्रकरणात हिसेंमध्ये पोलीस इन्स्पेक्टर सुबोध कुमार सिंह यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या प्रकरणावरून मोठं वादंग निर्माण झालं होतं. मी पण देशभक्त आहे. पण मला गोंधळ घालण्याची गरज वाटत नाही, असं शहांनी म्हटलं होतं.
"ज्यांना भारतात असुरक्षित वाटते, त्यांना बॉम्बनं उडवून दिलं पाहिजे"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 10:44 IST
उत्तर प्रदेशमधल्या मुजफ्फरनगरमधल्या एका भाजपा आमदारानं वादग्रस्त विधान केलं आहे.
ज्यांना भारतात असुरक्षित वाटते, त्यांना बॉम्बनं उडवून दिलं पाहिजे
ठळक मुद्देउत्तर प्रदेशमधल्या मुजफ्फरनगरमधल्या एका भाजपा आमदारानं वादग्रस्त विधान केलंभारतात ज्या लोकांना असुरक्षित वाटते, त्यांना बॉम्बनं उडवून दिलं पाहिजेभाजपाचे मुजफ्फरनगरमधले आमदार विक्रम सैनी यांनी उधळली मुक्ताफळे