शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इम्रान खान यांच्या शपथविधीला जाणारे गद्दार- सुब्रमण्यम स्वामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 18:01 IST

शपथविधी सोहळ्याला जाणाऱ्यांना राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

नवी दिल्ली: इम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी भारतातून जाणारे गद्दार असतील, असं भाजपाचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे. खान यांच्या शपथविधीसाठी भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर, कपिल देव, नवज्योत सिंग सिद्धू आणि अभिनेता आमीर खानला निमंत्रित करण्यात आलेलं आहे. यापैकी सिद्धू यांनी निमंत्रणाबद्दल जाहीर भाष्य करत आपण शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर स्वामी यांनी केलेल्या विधानानं राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. इम्रान खान यांच्या शपथविधीसाठी जे भारतातून जातील, त्यांना गद्दार समजण्यात येईल, असं भाजपाचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी म्हणाले. 'नवज्योत सिंग सिद्धू फक्त माजी क्रिकेटपटू नाहीत, तर ते देशाचे माजी खासदार आहेत. जर ते इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले, तर त्यांना गद्दार समजण्यात येईल,' असं स्वामींनी म्हटलं. स्वामी यांनी इम्रान खान यांची तुलना मोहम्मद घोरीशी केली आहे. 'महाराणा प्रताप यांनी मोहम्मद घोरीला एक संधी दिली होती. त्यानंतर पुढे काय झालं, ते सर्वांना माहित आहे,' असं स्वामी म्हणाले. इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्यांवर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीदेखील त्यांनी केली. पंजाब सरकारमधील मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू यांनी इम्रान खान यांच्या निमंत्रणाचा स्वीकार केला आहे. नवज्योत सिंह सिद्धू यांनी इम्रान खान यांचं तोंडभरुन कौतुकदेखील केलं आहे. इम्रान खान चारित्र्यसंपन्न व्यक्ती असून लोकांना एकत्र आणण्याची क्षमता इम्रान त्यांच्याकडे आहे, अशी स्तुतीसुमनं सिद्धू यांनी उधळली आहेत. खेळाडू लोकांना एकत्र आणतात. भौगोलिक सीमांची बंधनं मोडून माणसांना एकत्र आणण्याचं कौशल्य खेळाडूंकडे असतं, अशा शब्दांमध्ये सिद्धू यांनी इम्रान खान यांचं कौतुक केलं आहे.  

टॅग्स :Imran Khanइम्रान खानSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीBJPभाजपाPakistanपाकिस्तान