शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
5
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
6
रक्षा बंधन २०२५: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
7
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
8
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
9
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
10
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
11
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
12
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
13
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
14
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
15
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
16
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
18
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
19
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
20
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान

'ज्यांना कर्तव्यापेक्षा प्राण प्रिय असतात त्यांनी...;' सरदार पटेलांच्या विधानाच्या मदतीनं चन्नींचा मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 11:03 IST

PM Modi Security Breach Punjab CM Channi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेला कोणताही धोका नव्हता, हे पंजाबला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे, असं चन्नी म्हणाले.

PM Modi Security Breach Punjab CM Channi: पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी (Punjab CM Charanjit Singh Channi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील झालेल्या त्रुटी प्रकरणात भाजपवरच जोरदार पलटवार केला आहे. त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabh Bhai Patel) यांच्या एका विधानाचा उल्लेख करत केंद्रातील सत्ताधारी पक्ष भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) याच्यावर निशाणा साधला.

चन्नी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा एक फोटो ट्विट केला आहे. "ज्यांना कर्तव्यापेक्षा प्राणाची अधिक चिंता आहे, त्यांनी भारतासारख्या देशात मोठी जबाबदारी स्वीकारू नये," असं त्या फोटोसोबत लिहिण्यात आलं आहे. दरम्यान, यापूर्वी त्यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधानांची सुरक्षा जाणूनबुजून धोक्यात घातल्याच्या भाजपच्या आरोपांवरही भाष्य केलं होतं.

"त्यांना कोणता धोका होता. त्यांच्यापासून एक किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरही कोणी नव्हतं. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेले बहुतांश लोकही पंजाबमधील होते," अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी बोलताना दिली. "हे तथ्यहिन वक्तव्य आहे. हे पंजाबला बदनाम करण्याचं आणि राज्याला अस्थिर करण्यासाठी केलं जात आहे. जर पंतप्रधानांना कोणताही धोका असेल तर पहिली गोळी मी माझ्या छातीवर घेईन. यापेक्षा अधिक मी काय बोलू," असंही चन्नी म्हणाले.राष्ट्रपती राजवट लागू करायची आहेपंतप्रधानांना हेलिकॉप्टरने यायचे होते, पण अचानक त्यांनी रस्ते मार्गाने येण्याचा निर्णय घेतला. आमच्याकडून कुठलीही चूक झाली नाही, तरीदेखील आमच्या अधिकाऱ्यांना नोटिसा दिल्या जात आहेत. आमच्याकडून पंतप्रधानांच्या सुरक्षेत कोणतीही त्रुटी नसताना त्यांना नोटीस का दिली जात आहे? केंद्र सरकारने मुख्य सचिव आणि डीजीपी यांना नोटीस पाठवली आहे. निवडणुकीपूर्वी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा केंद्राचा डाव असल्याचा आरोप चन्नी यांनी केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPunjabपंजाबBJPभाजपा