शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

ज्यांनी देशाला लुटलं, त्यांना पै अन् पैचा हिशेब द्यावा लागणार- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 18:52 IST

मै भी चौकीदार या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित केलं आहे.

नवी दिल्ली- मै भी चौकीदार या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित केलं आहे. यावेळी त्यांना ग्वाल्हेरच्या एका महिला शिक्षिकेनं भ्रष्टाचारसंदर्भात प्रश्न विचारला, त्यावर मोदींनी सडेतोड उत्तर दिलं. मोदी म्हणाले, ज्यांनी देशाला लुटलं. त्यांना पै अन् पैचा हिशेब द्यावा लागणार आहे. 2014नंतर भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगाच्या दरवाज्यापर्यंत आणलं आहे, आता फक्त त्यांना तुरुंगात टाकण्याचा निर्णय घ्यायचा आहे, असंही मोदी म्हणाले आहेत. शिक्षक हा मोठा चौकीदार असतो. तो येणाऱ्या पिढीची सुरक्षा करतो. 2019मध्ये जेव्हा मी शपथ घेईन, तेव्हा 130 कोटी हिंदुस्तानी नागरिकांनी शपथ घेतली, असं समजावे.  भारतीय जवानांवर माझा पूर्ण विश्वास आहे. देशातील जवान आपल्या देशाची मान कधीच खाली पडू देणार नाहीत. जवानांच्या सामर्थ्यावर विश्वास असल्यानेच मी पूर्णपणे जवानांना स्वातंत्र दिले. सगळ्यांनाच माहित आहे दहशतवाद्यांचा मूळ कुठे आहे? दहशतवादी मुंबईत आले अनेकांना मारलं, उरीमध्ये आले जवानांवर हल्ला केला. हे कधीपर्यंत चालणार म्हणून मी निश्चित केलं, दहशतवाद्यांचं रिमोट कंट्रोल कुठून चालतं तिथेच हल्ला करायचा. माझ्यासाठी निवडणूक महत्त्वाची नव्हती तर देशाच्या सुरक्षेला मी प्राधान्य दिलं. पाकिस्तानमध्ये दहशतवादी प्रशिक्षण केंद्र चालवली जातात. मात्र जगापासून लपविण्यासाठी पाकिस्तान खोटं बोलतं म्हणून आम्ही अशा ठिकाणी वार केला त्यामुळे पाकिस्तानची बोलती बंद झाली असं पंतप्रधानांनी सांगितलं. मात्र आपल्याच देशातील काही लोक मोदींना शिव्या देण्यात धन्यता मानतात हे दुर्देव आहे अशी टीका मोदींनी काँग्रेसवर केली.  मी जनतेच्या पैशांवर पंजा पडू देणार नाही2014 च्या लोकसभा निवडणुकीत जनतेने मला दायित्व देऊन पंतप्रधानपदावर बसवलं. मी तेव्हा जनतेला आश्वासन दिलं होतं की जनतेचा पैसा मी जनतेच्या पैशांवर पंजा पडू देणार नाही. मी चौकीदाराच्या रुपात आपली जबाबदारी पार पडेन आज मला आनंद होतोय की आज देशातील प्रत्येक नागरिक जो या देशासाठी काम करतोय तो चौकीदार आहे, देशाच्या जनतेला राजा-महाराजांची गरज नाही, चौकीदार हवाय अस मतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले.  चौकीदार ही एक भावना आहे. चौकीदार एक व्यवस्था आहे, चौकीदाराला ना कोणता गणवेश आहे ना कोणतंही बंधन आहे. देशाला हुकूमशहा नको आहे. देशाची जनता चौकीदाराला पसंत करते असं पंतप्रधानांनी सांगितलं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक