शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जे गरीबांच्या झोपडीत फोटो सेशन करून मनोरंजन करतात, त्यांना...! नाव न घेता PM मोदींचा सोनीया-राहुल गांधींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 18:22 IST

मोदी पुढे म्हणाले, "समस्या ओळखणे एक गोष्ट आहे. मात्र, जबाबदारी असेल तर, त्या समस्येच्या समाधानासाठी समर्पित भावाने प्रयत्न करावे लागतात. आमचा प्रयत्न समस्येच्या समाधानाचा असतो आणि आम्ही समर्पित भावाने प्रयत्न करतो.

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही देशभरात ७०-७५ टक्के, जवळपास १६ कोटींहूनही अधिक घरांजवळ पाण्याचे कनेक्शन नव्हते. आमच्या सरकारने पाच वर्षांत १२ कोटी कुटूंबांच्या घरात नळाने पाणी देण्याचे काम केले आहे आणि हे काम वेगाने पुढे जात आहे. आम्ही गरिबांसाठी मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. यामुळेच राष्ट्रपतींनीही आपल्या अभीभाषणात याचे सविस्तर वर्णन केले आहे. जे लोक, गरीबांच्या झोपडीत फोटो सेशन करून आपले मनोरंजन करत असतात, त्यांना संसदेत गरीबांसंदर्भात बोलणे बोरिंगच वाटणार. मी त्यांचा राग समजू शकतो." असे म्हणत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधीपक्ष नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. ते लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलत होते. 

मोदी पुढे म्हणाले, "समस्या ओळखणे एक गोष्ट आहे. मात्र, जबाबदारी असेल तर, त्या समस्येच्या समाधानासाठी समर्पित भावाने प्रयत्न करावे लागतात. आमचा प्रयत्न समस्येच्या समाधानाचा असतो आणि आम्ही समर्पित भावाने प्रयत्न करतो.

"आपल्या देशात एक पंतप्रधान होऊन गेले आहेत, त्यांना 'मिस्टर क्लीन' म्हणण्याची एक फॅशन झाली होती. त्यांनी एक समस्या ओळखली होती आणि ते म्हणाले होते की, दिल्लीतून एक रुपया निघतो, तर गावात १५ पैसेच पोहोचतात. आता त्यावेळी तर पंचायतीपासून ते संसदेपर्यंत एकाच पक्षाचे राज्य होते. ते सार्वजनिकपणे बोलले होते की, एक रुपया निघतो आणि १५ पैसे पोहोचतात. फारच 'आश्चर्यकारक' हातसफाई होती," असेही मोदी यावेळी म्हणाले.

काय म्हणाले होते राहुल गांधी आणि सोनिया गांधी? -राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर सोनिया गांधी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना, "त्या (राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू) खूप थकलेल्या दिसत होत्या, शेवटी बोलू शकत नव्हत्या. बिचाऱ्या महिला राष्ट्रपती," असे सोनिया गांधी यांनी म्हटले होते. तर राहुल गांधी यांनीही राष्ट्रपतींच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना, राष्ट्रपतींचे भाषण अत्यंत कंटाळवाणे होते आणि त्यात नवीन काहीच नाही," असं राहुल गांधी यांनी म्हटले होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabhaलोकसभा