‘त्या’ भारतीयांचा प्रश्नावर गांभीर्याने विचार - स्वराज

By Admin | Updated: August 2, 2016 04:48 IST2016-08-02T04:48:17+5:302016-08-02T04:48:17+5:30

सौदी अरेबियामध्ये अन्नाच्या टंचाईला तोंड देत असलेल्या व नोकऱ्या गमावलेल्या सुमारे १० हजार भारतीयांचा प्रश्न सरकारने गांभीर्याने हाती घेतला

'Those' seriously considering the issue of Indians - Swaraj | ‘त्या’ भारतीयांचा प्रश्नावर गांभीर्याने विचार - स्वराज

‘त्या’ भारतीयांचा प्रश्नावर गांभीर्याने विचार - स्वराज


नवी दिल्ली : सौदी अरेबियामध्ये अन्नाच्या टंचाईला तोंड देत असलेल्या व नोकऱ्या गमावलेल्या सुमारे १० हजार भारतीयांचा प्रश्न सरकारने गांभीर्याने हाती घेतला आहे, असे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सोमवारी म्हणाल्या. मी स्वत: या प्रश्नात लक्ष घातले आहे, असे स्वराज संसदेत यांनी संसदेत सांगितले.
परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह हे मंगळवारी सौदी अरेबियाला भेट देत आहेत. सौदी अरेबियामध्ये बेरोजगार झालेल्या कोणत्याही भारतीयाला जेवणाचा प्रश्न भेडसावणार नाही, याची मी खात्री देते. दर तासाला मी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: 'Those' seriously considering the issue of Indians - Swaraj