थोरात साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुक्रवारी प्रारंभ

By Admin | Updated: October 30, 2016 22:46 IST2016-10-30T22:46:29+5:302016-10-30T22:46:29+5:30

संगमनेर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याचा ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांनी दिली.

Thorate Sugar Factory's Crop Started on Friday | थोरात साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुक्रवारी प्रारंभ

थोरात साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुक्रवारी प्रारंभ

गमनेर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याचा ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांनी दिली.
आ. बाळासाहेब थोरात व कांचनताई थोरात यांच्या हस्ते, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत व कारखान्याचे अध्यक्ष माधवराव कानवडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, दुर्गाताई तांबे, रणजित देशमुख, सत्यजित तांबे, मिराताई चकोर, शिवाजीराव थोरात, रामदास वाघ, रावसाहेब नवले, मुधकर नवले, शंकर खेमनर, बाबा ओहोळ, लक्ष्मणराव कुटे, अमित पंडित, राजेश मालपाणी, सीताराम वर्पे, बाळकृष्ण दातीर, केशवराव मुर्तडक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे, अशी माहिती कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Thorate Sugar Factory's Crop Started on Friday