गंगनम स्टाईल गाण्यावर थिरकले टीडीपी खासदार
By Admin | Updated: October 12, 2015 22:19 IST2015-10-12T22:07:42+5:302015-10-12T22:19:32+5:30
येथील एका कार्यक्रमात चक्क खासदार थिरकताना दिसले आणि तेही कोरियाचे गायक पीएसवाय याच्या गंगनम स्टाईल या गाण्यावर...

गंगनम स्टाईल गाण्यावर थिरकले टीडीपी खासदार
>ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. १२ - येथील एका कार्यक्रमात चक्क खासदार थिरकताना दिसले आणि तेही कोरियाचे गायक पीएसवाय याच्या गंगनम स्टाईल या गाण्यावर...
तेलगू देशम पार्टीचे ५६ वर्षीय खासदार सी मल्ला रेड्डी येथील सीएमआर इंजिनीअरिंग आणि टेक्नॉलॉजी कॉलेजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर गाण्यांचा कार्यक्रम सुरु झाला. यामध्ये गंगनम स्टाईलच्या या गाण्यावर विद्यार्थी डान्स करत असताना कार्यक्रमाच्या सुत्रसंचालकाने खासदार सी मल्ला रेड्डी यांना व्यासपीठावर बोलविले आणि त्यांना डान्स करण्यात भाग पाडले. त्यांचा डान्स पाहून उपस्थित कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शिट्ट्या आणि टाळ्या वाजवल्या.
दरम्यान, खासदार सी मल्ला रेड्डी यांचा हा डान्सचा व्हिडीओ सोशल मिडीयात व्हायरल झाला आहे.