नाट्य परिषदेच्या सभासद यादीचे संगणकीकरण तेराशे सभासद : मध्यवर्ती शाखेचे काम मात्र कूर्मगतीने

By Admin | Updated: May 21, 2014 00:47 IST2014-05-21T00:47:09+5:302014-05-21T00:47:09+5:30

नाशिक : मागील वर्षी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेच्या निवडणुकीत झालेला घोळ लक्षात घेता नाशिक शाखेने सभासद यादीचे संगणकीकरणाचे काम पूर्ण केले असून, सभासदांची संपूर्ण माहिती अद्ययावत करण्यात आली आहे. नाशिक शाखेची सभासदसंख्या १३०० पर्यंत जाऊन पोहोचली आहे.

Thirteenth member of the Board of Directors of the Natya Parishad: Intermediate branch work only | नाट्य परिषदेच्या सभासद यादीचे संगणकीकरण तेराशे सभासद : मध्यवर्ती शाखेचे काम मात्र कूर्मगतीने

नाट्य परिषदेच्या सभासद यादीचे संगणकीकरण तेराशे सभासद : मध्यवर्ती शाखेचे काम मात्र कूर्मगतीने

शिक : मागील वर्षी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेच्या निवडणुकीत झालेला घोळ लक्षात घेता नाशिक शाखेने सभासद यादीचे संगणकीकरणाचे काम पूर्ण केले असून, सभासदांची संपूर्ण माहिती अद्ययावत करण्यात आली आहे. नाशिक शाखेची सभासदसंख्या १३०० पर्यंत जाऊन पोहोचली आहे.
नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेची पंचवार्षिक निवडणूक मागील वर्षी झाली. आरोप-प्रत्यारोपांबरोबरच बोगस मतपत्रिकांवरूनही सदर निवडणूक प्रचंड गाजली होती. निवडणुकीतील सभासद मतदारांची यादी अद्ययावत नसल्याने उमेदवारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. अनेक शाखेच्या सभासद मतदार यादीत घोळ आढळून आला होता. मयत सभासदांची नावे कायम राहण्याबरोबरच अनेक मतदारांची दोन-तीन ठिकाणी नावे आढळून आली, तर बव्हंशी मतदारांचे पत्ते व भ्रमणध्वनी चुकीचे होते. त्यामुळे अनेक मतदारांच्या हाती मतपत्रिकाच न मिळाल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले होते. निवडणुकीत सभासद मतदारांच्या यादीचा घोळ लक्षात घेता सत्तारूढ झालेले अध्यक्ष मोहन जोशी व कार्यवाह दीपक करंजीकर यांनी मध्यवर्ती शाखेच्या सभासदांची माहिती अद्ययावत करण्याची मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याच धर्तीवर नाशिक शाखेनेही सभासद यादीचे संगणकीकरणाचे काम सुरू केले होते. नाशिक शाखेचे सदस्य डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी शाखेला मागील वर्षी एक संगणक संच भेट दिला होता. त्यामुळे नाशिक शाखेची मोठी सोय झाली होती. त्यामार्फतच नाशिक शाखेने सर्व सभासदांची संपूर्ण माहिती अद्ययावत केली असून, सर्वच्या सर्व १३०० सभासदांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. नाशिक शाखेने संगणकीकरणात आघाडी घेतली असली, तरी मध्यवर्ती शाखेचे काम मात्र अजूनही कूर्मगतीनेच सुरू आहे.
इन्फो
अद्ययावत यादी
नाशिक शाखेचे सुमारे १३०० सभासद असून, त्यांची संपूर्ण माहिती अद्ययावत करण्यात आली आहे. वर्षभरात सभासदांच्या नाव, पत्त्यासह दूरध्वनी क्रमांक अद्ययावत करण्यात आले आहेत. मयत सभासदांची नावे वगळण्यात आली आहेत. काही सभासदांची अन्यत्र बदली झाल्याने त्यांची नावे त्यांच्या संमतीनुसार स्थलांतरित करण्यात आली आहेत. अजूनही काही सभासदांना शंका असल्यास त्यांनी आपली नावे अद्ययावत करून घ्यावी.
- सुनील ढगे, कार्यवाह

Web Title: Thirteenth member of the Board of Directors of the Natya Parishad: Intermediate branch work only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.