चिंचगव्हाणात डेंग्यूसदृश्य तापाचा तिसरा बळी

By Admin | Updated: May 16, 2014 23:43 IST2014-05-16T23:43:00+5:302014-05-16T23:43:00+5:30

मनाठा - चिंचगव्हाण येथील (डेंग्यूसदृश्य) तापामुळे मृत्यू होणार्‍यांची संख्या तीन झाली़ आज पहाटे 4 वा़ उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला़

Third victim of dengue fever in Chinchwagwana | चिंचगव्हाणात डेंग्यूसदृश्य तापाचा तिसरा बळी

चिंचगव्हाणात डेंग्यूसदृश्य तापाचा तिसरा बळी

मनाठा - चिंचगव्हाण येथील (डेंग्यूसदृश्य) तापामुळे मृत्यू होणार्‍यांची संख्या तीन झाली़ आज पहाटे 4 वा़ उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला़
शंकरराव संभाजी गुडूप (वय 65) यांना एका आठवड्यापासून ताप येत होता़ नांदेडच्या खाजगी दवाखान्यात त्यांचा उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला़ यापूर्वी नोव्हेंबरमध्ये दोघांचा मृत्यू झाला होता़ त्यापैकी कस्तुरबाई मुरली कवडे (वय 44) यांचा तर डेंग्यूने मृत्यू झाल्याचा अहवाल आह़े या अहवालानंतर पुण्याचे आरोग्य विभाग 15 दिवस गावात तळ ठोकून होत़े धूळफवारणी केल्यानंतर हे प्रमाण कमी झाले होत़े परंतु या महिन्यात पुन्हा तापीने डोके वर काढल़े
याबाबत गावचे सरपंच संगीता नारायण भुतनर म्हणतात, पुन्हा एकदा गावात धूळफवारणी करावी़ तर उपसरपंच बंडू कदम म्हणाले, डॉ़पवार यांनी एक-दोन दिवसाला गावाला भेट द्यावी़.

Web Title: Third victim of dengue fever in Chinchwagwana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.