काश्मीर, झारखंडमध्ये तिस-या टप्प्यातील मतदानास सुरूवात
By Admin | Updated: December 9, 2014 11:05 IST2014-12-09T10:23:42+5:302014-12-09T11:05:23+5:30
झारखंड विधानसभेच्या १७ व जम्मू काश्मीर विधानसभेच्या १६ जागांसाठी जम्मू-काश्मीर व झारखंडमध्ये मतदानास सुरूवात झाली आहे.

काश्मीर, झारखंडमध्ये तिस-या टप्प्यातील मतदानास सुरूवात
ऑनलाइन लोकमत
जम्मू / रांची, दि. ९ - जम्मू-काश्मीर व झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यातील मतदानास आज सकाळपासून सुरूवात झाली आहे. झारखंड विधानसभेच्या १७ व जम्मू काश्मीर विधानसभेच्या १६ जागांसाठी आज मतदान होत आहे.
गेल्या आठवड्यात काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ला व कडाक्याची थंडी असतानाही राज्यात मतदारांचा उत्साह कायम असून नागरिक मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडताना दिसत आहेत. दरम्यान मतदानादरम्यन कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये १४४ उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद होणार असून १३ लाख मतदार १ हजारांहून अधिक मतदान केंद्रा वर मतदानाचा हक्क बजावतील. तर झारखंडमध्ये सकाळी ७ पासून मतदान सुरू झाले असून ५० लाख मतदार ३८९ उमेदवारांचे भवितव्य ठरवतील.