तिसरी पास सागरने बनवले हॅलिकॉप्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2016 15:17 IST2016-02-02T15:17:51+5:302016-02-02T15:17:51+5:30
एरोनॉटिकल इंजिनीयरींग किंवा उच्च शिक्षणाची कोणतीही पदवी नसताना फक्त तिस-या इयत्तेपर्यंत शिक्षण झालेल्या आसाममधल्या एका युवकाने स्वत:चे हॅलिकॉप्टर बनवले आहे.

तिसरी पास सागरने बनवले हॅलिकॉप्टर
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - एरोनॉटिकल इंजिनीयरींग किंवा उच्च शिक्षणाची कोणतीही पदवी नसताना फक्त तिस-या इयत्तेपर्यंत शिक्षण झालेल्या आसाममधल्या एका युवकाने स्वत:चे हॅलिकॉप्टर बनवले आहे. सागर प्रसाद शर्मा असे या युवकाचे नाव आहे.
हॅलिकॉप्टर बनवण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता नसतानाही सागरने स्वत:चे बुद्धीकौशल्य आणि मेहनतीच्या बळावर हॅलिकॉप्टर बनवण्याचे स्वप्न पूर्ण केले. आसामच्या धेमाजी जिल्ह्यात दीमाऊ गावामध्ये सागर रहातो. त्याचा वेल्डींगचा व्यवसाय आहे. सागर गावातील घराजवळच्या एका खोलीमध्ये कोणालाही कळू न देता हॅलिकॉप्टर बांधणीचे काम करत होता.
सागरने या हॅलिकॉप्टरला 'पवन शक्ती' असे नाव दिले असून, काही दिवसातच त्याचे हॅलिकॉप्टर उड्डाणाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. तीन वर्षापासून तो या प्रकल्पावर काम करत होता.
सागरला हे हॅलिकॉप्टर बनवण्यासाठी जवळपास १५ लाख रुपये खर्च आला. सागरने त्याच्या जवळच्या मित्राला त्याची योजना सांगितली तेव्हा त्याचाही विश्वास बसला नव्हता. मात्र आता सागरने बनवलेले हॅलिकॉप्टर पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.