शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या यादीत दलित, मुस्लिम उमेदवारांना संधी; काँग्रेसचे आतापर्यंत ८८ उमेदवार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 05:40 IST

तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवारी संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आणखी १३ जणांची तिसरी यादी जाहीर केली आहे.

- धनाजी कांबळे

हैदराबाद : तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवारी संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आणखी १३ जणांची तिसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने आतापर्यंत ९४ पैकी ८८ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात दलित, आदिवासी आणि मुस्लिमांना संधी देण्यात आली आहे.तसेच तेलंगणा जन समितीचे अध्यक्ष एम. कोडनदरम यांना जनगाव मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करायचा होता. मात्र, प्रदेश काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष पोनाला लक्षमैय्या यांना या मतदारसंघातून तिकीट देण्यात आल्याने काँग्रेस आघाडीतील टीजेएसचे नेते कोडनदरम यांना दुस-या मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागण्याची शक्यता आहे.काँग्रेसने जाहीर केलेल्या तिस-या यादीत एससी, एसटी, बीसी, मुस्लीम आणि रेड्डी समाजाच्या उच्छुकांना संधी देण्यात आली आहे. विशेषत: अबिद रसूल खान यांनी टिका केली होती की, प्रामाणिक आणि निष्ठावान मुस्लिम कार्यकर्त्यांना डावलून पोपटपंची करणाºयांना उमेदवारी दिली आहे. तसेच या मुद्यावर त्यांनी काँग्रेसलासोडचिठ्ठी देऊन टीआरएसमध्ये प्रवेश केल्यानंतर तिसºया यादीत तीन मुस्लिम उमेदवारांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. काँग्रेसने लक्षमैय्या यांच्यासह माजी मंत्री सोयम बापू राव, माजी आमदार डी. सुधीर रेड्डी, प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अदंकी दयाकर यांनाही उमेदवारी दिली आहे.दरम्यान, भाजपने सात जणांची चौथी यादी जाहीर केली असून, आतापर्यंत ९३ जणांची नावे जाहीर केली आहेत.४३ गुन्हे, तरी रिंगणातभाजपचे नेते राजा सिंग हे वादग्रस्त आणि भडकाऊ भाषण करण्यासाठी प्रसिद्ध असून, ते सध्या निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्यावर ४३ फौैजदारी गुन्हे दाखल असून, त्यांच्याकडे २.८७ कोटींची संपत्ती असल्याचे त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. घोशामल मतदारसंघातून ते पुन्हा निवडणूक लढवीत आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसTelangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018