शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

केंद्रीय मंत्रिमंडळाचा तिसरा विस्तार, जाणून घ्या कोणाला मिळाले कोणते खाते

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2017 16:22 IST

2019 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अखेर मोदी सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार राष्ट्रपतीभवनात पार पडला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये 9 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर...

नवी दिल्ली, दि. 3 - 2019 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अखेर मोदी सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार राष्ट्रपतीभवनात पार पडला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये 9 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर चार राज्यमंत्र्यांना कॅबिनेटपदी बडती देण्यात आली आहे. आज सकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर झाले आहे. विस्तार आणि फेरबदलांच्या निमित्ताने पुन्हा एकदा मोदी-शहा जोडगोळीच्या धक्कातंत्राचा प्रत्यय दिसून आला आहे. सत्यपाल सिंग यांचा अपवाद वगळता मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या ९ नव्या चेहरेही अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का ठरला. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या संरक्षण खात्याचा कारभार मोदींनी निर्मला सीतारामन यांच्याकडे सोपवला. या पदासाठी निर्मला सितारामन यांनी निवड अनपेक्षित ठरली. सीतारामन या इंदिरा गांधी यांच्यानंतरच्या देशाच्या दुसऱ्या महिला संरक्षण मंत्री ठरल्या आहेत.

सुरेश प्रभूंकडे वाणिज्य, पियुष गोयल यांच्याकडे रेल्वे मंत्रालय, धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पेट्रोलियम मंत्रालयासोबत कौशल विकास मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच स्मृती इराणींकडे माहिती प्रसारण मंत्रालयासोबत वस्रोद्योग मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याबरोबरच राज्यवर्धन सिंह राठोड यांच्याकडे क्रीडा आणि युवाक-कल्याण खात्याचा स्वतंत्र प्रभार सोपवण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या नितीन गडकरीं यांच्याकडे गंगा आणि जलसंसाधन मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्बो मंत्रिमंडळात आज फेरबदल करण्यात आला. मंत्रिमंडळातून आज अधिकृतरित्या डच्चू देण्यात आलेल्या सहा मंत्र्यांनी यापूर्वीच स्वखुशीने आपापल्या पदाचे राजीनामे दिले होते. आगामी लोकसभा निवडणूक आणि सरकारची आतापर्यंतची कामगिरी या दोन निकषांच्या पार्श्वभूमीवर आजचा मंत्रिमंडळ विस्तार निर्णायक ठरला. 2019साली होणारी लोकसभा निवडणूक अवघ्या दीड वर्षांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे आज मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेल्या मंत्र्यांच्या कामगिरीकडे यापुढील काळात सातत्याने सर्वांचे लक्ष राहीलफेरबदल कॅबिनेट मंत्रीनिर्मला सीतारामन - संरक्षणमंत्रीनितीन गडकरी - दळणवळण, शिपिंग, जलसंपदा, नदीविकास, गंगा स्वच्छताधर्मेंद्र प्रधान - पेट्रोलियम, कौशल्य विकास मंत्रालयपियुष गोयल - रेल्वे आणि कोळसा मंत्रालयस्मृती इराणी - माहिती, प्रसारण, वस्त्रोद्योग खातंमुक्तार अब्बास नक्वी - अल्पसंख्याक मंत्रीउमा भारती - पेयजल आणि स्वच्छता मंत्रीसुरेश प्रभू - वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयफेरबदल राज्यमंत्रीडॉ.वीरेंद्र कुमार - महिला, बालविकास, अल्पसंख्याक राज्यमंत्रीअनंतकुमार हेगडे - कौशल्य विकास राज्यमंत्रीविजय गोयल - संसदीय कार्य राज्यमंत्रीअश्विनीकुमार चौबे - आरोग्य, कुटुंबकल्याण राज्यमंत्रीअल्फोन्स कन्नथानम - पर्यटन, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्रीमहेश शर्मा - पर्यावरण, सांस्कृतिक राज्यमंत्रीसत्यपाल सिंह - मनुष्यबळ विकास राज्यमंत्रीशिवप्रतापसिंह शुक्ल - अर्थ राज्यमंत्रीआर.के. सिंह - ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)गजेंद्र शेखावत - कृषी राज्यमंत्री

टॅग्स :GovernmentसरकारNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहNitin Gadkariनितीन गडकरीSuresh Prabhuसुरेश प्रभू