मोदींच्या मंत्रिमडळाचा विस्तार, चार राज्यमंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती, 9 नव्या चेहऱ्यांना राज्यमंत्रिपद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2017 11:07 AM2017-09-03T11:07:10+5:302017-09-03T11:37:54+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्याचा शपथविधी  संपन्न झाला असून, चार कॅबिनेट आणि 9 राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली.  आज झालेल्या शपथविधीमध्ये एकूण 13 मंत्र्यांना शपथ देण्यात आली. 

Modi government extension, four cabinet ministers and 9 ministers sworn in | मोदींच्या मंत्रिमडळाचा विस्तार, चार राज्यमंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती, 9 नव्या चेहऱ्यांना राज्यमंत्रिपद

मोदींच्या मंत्रिमडळाचा विस्तार, चार राज्यमंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती, 9 नव्या चेहऱ्यांना राज्यमंत्रिपद

नवी दिल्ली, दि. 3 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्याचा शपथविधी  संपन्न झाला असून, चार कॅबिनेट आणि 9 राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली.  आज झालेल्या शपथविधीमध्ये एकूण 13 मंत्र्यांना शपथ देण्यात आली.  2019 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमडळ विस्ताराची आखणी केली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात केवळ भाजपाच्याच मंत्र्यांचा समावेश करण्यात आला.   
शपथविधीच्या सुरुवातीला धर्मेंद्र प्रधान, पियूष गोयल, निर्मला सीतारमन आणि मुख्तार अब्बास नक्वी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. या चारही जणांनी मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. आता त्यांना कॅबिनेटपदी बढती देण्यात आली आहे. त्यानंतर शिवप्रताप शुक्ल, अश्निनीकुमार चौबे, डॉ. वीरेंद्र कुमार,  अनंत कुमार हेगडे,  राजकुमार सिंह,  हरदीपसिग पुरी, गजेंद्रसिंह शेखावत, सत्यपाल सिंह, अल्फोन्स कन्ननथनम यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 

राज्यमंत्रिपदी निवड झालेल्या मंत्र्यांची थोडक्यात माहिती 

- राज्यमंत्रिपदी निवड झालेले  शिव प्रताप शुक्ला उत्तरप्रदेशातील राज्यसभा खासदार आहेत. ते ग्रामविकास संसदीय स्थायी समितीचे सदस्य आहेत. 
- अश्विनी कुमार चौबे हे बिहारमधील बक्सर, लोकसभा खासदार आहेत. ते ऊर्जा आणि स्थायी समितीवर संसदीय समितीचे सदस्य आहेत.  
- वीरेंद्र कुमार हे टिकमगढ, मध्य प्रदेशचे लोकसभा खासदार आहेत, त्यांनी एमए पी.एचडी पदव्या प्राप्त केल्या आहेत. 
- अनंतकुमार हेगडे कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्यातून निवडून गेले आहेत. ते परराष्ट्र व्यवहार आणि मानव संसाधन विकास मंडळाच्या स्थायी समितीचे सदस्य आहेत.
- माजी सनदी अधिकारी आरके सिंह हे बिहारमधून भाजपाच्या तिकिटावर निवडून आले होते.  
- हरिदिप सिंग पुरी 1 9 74 च्या तुकडीचे माजी आयएफएस अधिकारी आहेत, ते ब्राझिलमध्ये भारताचे राजदूत होते, त्यांचे वडिलही मुत्सद्दी होते. 
-गजेंद्र सिंह शेखावत जोधपूर लोकसभा खासदार, राजस्थान ते अर्थसंकल्प संसदीय स्थायी समितीचे सदस्य आणि फेलोशिप कमिटीचे अध्यक्ष आहेत. 
- सत्यपाल सिंह 1980 च्या बँचचे, महाराष्ट्र केडरचे माजी आयपीएस अधिकारी आहेत, ते बागपत येथून लोकसभेत गेले आहेत. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी अजित सिंह यांचा पराभव केला होता.
-अल्फोन्स कन्ननथनम कोट्टयमचे असून प्रशासकीय सेवेत कार्यरत होते, त्यांना डिमॉलिशन मॅन नावाने ओळखले जाते.  
 

Web Title: Modi government extension, four cabinet ministers and 9 ministers sworn in

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.