चोऱ्या / घरफोड्या
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:19+5:302015-01-23T23:06:19+5:30
अजनीत चाकूच्या धाकावर लुटमार

चोऱ्या / घरफोड्या
अ नीत चाकूच्या धाकावर लुटमारनागपूर : चाकूचा धाक दाखवून एका तरुणाला त्याच्या घरासमोर लुटल्याची घटना अजनीत घडली. संजय सोहनलाल सहारे (वय २९) हे रात्री ११.४५ ला कामावरून घरी परतले. दार उघडत असताना मोटरसायलवरील दोन तरुणांनी त्यांना रोखले. चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडून रोख २ हजार, मोबाईल आणि एटीएम कार्ड हिसकावून नेले. या कार्डचा गैरवापर करून लुटारूंनी २३,५०० रुपये काढून घेतले. सहारेंच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी जबरीचोरीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे. ----एमआयडीसी, सीताबर्डीत घरफोडीनागपूर : एमआयडीसी आणि सीताबर्डीत घरफोडीच्या दोन घटना घडल्या. एमआयडीसीत टायको इंडिया कंपनीची भिंत तोडून चोरटे आत शिरले. त्यांनी १५ हजारांचे लोखंडी अँगल चोरून नेले. आज सकाळी ८.३० वाजता ही घटना उघडकीस आली. खेमराज मोतीरामजी नंदरे (वय ३४) यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अशाच प्रकारे एमपी बसस्थानकासमोरचे व्यापारी संकुलातील एस. ए. मोबाईल शॉपीची भिंत फोडून चोरट्यांनी १ हजार रोख, मोबाईल आणि इतर वस्तूंसह ५१ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. सुरेश निंबाजी आवारे (वय ५२) यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. ------ जरीपटक्यात चोरी नागपूर : इंदोरा बारा खोली मागे, श्रावस्ती बौध्द विहाराजवळ राहणारे कमल गोपीचंद मुंगाटे (वय ४२) यांच्या घरातून चोरट्यांनी रोख ४० हजार तसेच सोन्याचे दागिने असा एकूण ६९ हजारांचा ऐवज चोरून नेला. १९ ते २० जानेवारी दरम्यान ही घटना उघडकीस आली. मंुगाटे यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे --लुटमारीचा प्रयत्न फसलानागपूर : व्यापाऱ्याने आरडाओरड केल्यामुळे चाकूचा धाक दाखवून लुटमार करण्याच्या प्रयत्नात असलेले आरोपी पळून गेले. जरीपटक्यात १८ जानेवारीला रात्री ८.१५ वाजता ही घटना घडली. पवन सावलदास शुभवानी (वय ३०) हे आपल्या पॉवर ग्रीड चौकातील सावलदास डेली निड्स या दुकानात हजर होते. तोंडाला कपडा बांधून आलेल्या तिन आरोपींनी चाकूचा धाक दाखवून लुटमारीचा प्रयत्न केला. शुभवानी यांनी जोरात आरडाओरड केल्यामुळे आजूबाजूची मंडळी धावून आली. त्यामुळे लुटारू पळून गेले. शुभवानी यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला.