शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

ते लोक माझ्या जीवावर उठलेत- केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 18:47 IST

हल्ल्यानंतर प्रथमच केजरीवाल यांचा प्रसारमाध्यमांशी संवाद

नवी दिल्ली : माझ्यावर हल्ले होत नाहीत. तर ते जाणूनबुजून घडवले जात आहेत, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. काल सचिवालयात केजरीवाल यांच्यावर एका व्यक्तीनं हल्ला केला. यानंतर केजरीवाल यांनी प्रथमच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. मला मारण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोपदेखील त्यांनी केला. अरविंद केजरीवाल यांच्यावर काल झालेल्या हल्ल्यासाठी आम आदमी पार्टीनं भाजपाला जबाबदार धरलं आहे. 'माझ्यावर दोन वर्षात चार हल्ले झाले आहेत. ही साधीसुधी बाब नाही. हे हल्ले होत नाहीत. तर ते घडवून आणले जात आहेत. या हल्ल्यांसाठी आदेश दिले जात आहेत. आम्ही यांच्यासाठी अडथळा ठरत आहोत. त्यामुळेच हे सर्व मिळून माझ्या जीवावर उठले आहेत. हे लोक वारंवार आमच्यावर हल्ले करत आहेत,' असा आरोप केजरीवाल यांनी केला. केजरीवाल यांच्यावर काल सचिवालयात हल्ला झाला. केजरीवाल त्यांच्या चेंबरमधून एक व्यक्ती त्यांच्याजवळ आली. या व्यक्तीनं बोलता बोलता अचानक केजरीवालांवर मिरचीपूड फेकली. यानंतर पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं. या व्यक्तीचं नाव अनिल असल्याची माहिती पोलीस चौकशीत समोर आली. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह आपच्या अनेक नेत्यांनी या हल्ल्यामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप केला आहे. तर भाजपाच्या नेत्यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. ही संपूर्ण घटना म्हणजे ड्रामा असल्याचं भाजपा नेत्यांनी म्हटलं आहे. निवडणूक जवळ आल्यामुळे आपकडून ड्रामा सुरू झाला आहे, असा दावा दिल्ली भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी केला आहे. निवडणूक जवळ येऊ लागताच केजरीवालांवर हल्ले होऊ लागतात. त्यामुळे यामागचं सत्य समोर यायला हवं, असं तिवारी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्लीBJPभाजपा