शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

त्यांनी ‘इंडिया’चा अर्थ सांगावा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खासदारांच्या बैठकीत घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 06:44 IST

विरोधी पक्षाचा एकही खासदार तुम्हाला ‘इंडिया’चा  अर्थ सांगू शकत नाही.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रात्री राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) ४८ खासदारांसोबत बैठक घेतली. तीत विरोधी आघाडीवर निशाणा साधत ते म्हणाले की, ही युती नाईलाजातून तयार झाली आहे. विरोधी पक्षाचा एकही खासदार तुम्हाला ‘इंडिया’चा  अर्थ सांगू शकत नाही.संसदेच्या ॲनेक्सी इमारतीत झालेल्या या बैठकीत पंतप्रधानांनी खासदारांना सांगितले की, गरीब ही सर्वांत मोठी जात आहे, त्यासाठी काम करा. केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. राज्य यंत्रणेच्या मदतीशिवाय या योजनांचा लाभ गैर-भाजपशासित राज्यांमध्ये जनतेपर्यंत पोहोचवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, खासदारांनी शक्य तितके त्यांच्या लोकसभा मतदारसंघात राहावे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करावी. सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त चालवले जाणारे ‘जनसंपर्क अभियान’ सातत्याने पुढे न्यावे लागेल आणि निवडणुकीला अवघे काही महिने बाकी असल्याने पूर्ण उत्साहाने काम करावे लागेल.

एका दिवसात २ क्षेत्रांच्या बैठका- पंतप्रधान मोदींनी बुधवारी प्रथम उत्तर प्रदेशातील काशी आणि अवध भागातील एनडीएच्या खासदारांची महाराष्ट्र भवनात बैठक घेतली. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, अनुप्रिया पटेल आणि महेंद्र नाथ पांडे तिसऱ्या बैठकीत उपस्थित होते.- क्षेत्र ४ च्या दुसऱ्या बैठकीला तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, पुद्दुचेरी, अंदमान आणि निकोबार बेटे आणि लक्षद्वीपमधील खासदारांनी हजेरी लावली. या बैठकीला भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, प्रल्हाद जोशी आणि व्ही.मुरलीधरन पांडे उपस्थित होते.

खासदारांची ११ क्षेत्रांमध्ये विभागणी१० दिवसांत एनडीएच्या सर्व खासदारांना भेटण्याची पंतप्रधान मोदींची योजना आहे. भाजपने एनडीएच्या खासदारांची ११ क्षेत्रांमध्ये (क्लस्टर) विभागणी केली आहे. केंद्रीय मंत्री संजीव बालयन, बीएल वर्मा, धर्मेंद्र प्रधान आणि शंतनू ठाकूर हे मोदी आणि खासदारांमधील बैठकीची तयारी करत आहेत.

लाल डायरी : भ्रष्टाचाराचा याहून अधिक अस्सल पुरावा असू शकत नाही...राजस्थानचे बडतर्फ मंत्री राजेंद्र गुढा यांनी  भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या ‘लाल डायरी’ची तीन पाने जारी केल्यानंतर, भाजपने गुरुवारी काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचाराचा याहून अधिक अस्सल पुरावा असू शकत नाही, असा दावा केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसIndiaभारतPoliticsराजकारणlok sabhaलोकसभा