न्याय मागण्यासाठी ‘ते’ पायी निघाले दिल्लीला, धर्मांतर प्रकरणी पोलिसांकडून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 09:46 AM2021-08-02T09:46:25+5:302021-08-02T09:47:52+5:30

धर्मांतर करणाऱ्यांच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने चौकशी केलेले प्रवीणकुमार या प्रकाराने व लोकांकडून होणाऱ्या त्रासामुळे व्यथित झाले आहेत.

'They' set foot in Delhi to seek justice, police probe into conversion case | न्याय मागण्यासाठी ‘ते’ पायी निघाले दिल्लीला, धर्मांतर प्रकरणी पोलिसांकडून चौकशी

न्याय मागण्यासाठी ‘ते’ पायी निघाले दिल्लीला, धर्मांतर प्रकरणी पोलिसांकडून चौकशी

Next

नवी दिल्ली : धर्मांतर करणाऱ्यांच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने चौकशी केलेले प्रवीणकुमार या प्रकाराने व लोकांकडून होणाऱ्या त्रासामुळे व्यथित झाले आहेत. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी ते चार दिवसांपूर्वी सहारनपूरवरून चक्क पायी चालत दिल्लीच्या दिशेने निघाले आहेत.  पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयकडून मिळालेल्या पैशातून देशातील काही विघातक शक्ती धर्मांतरे घडवित असल्याचे प्रकरण उजेडात आणल्याचा उत्तर प्रदेश पोलिसांचा दावा आहे. या प्रकरणी उमर गौतम या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्याकडील कागदपत्रांत साथीदारांचीही नावे मिळाली. 

सर्वोच्च न्यायालय मला न्याय देईल
धर्मांतर प्रकरणामध्ये आपण गुंतलो नसल्याचा दावा करणारी कागदपत्रे प्रवीणकुमार यांनी सहारनपूर जिल्हा न्यायाधीशांसमोर सादर केली. त्यानंतर काही सामान, दोन पुस्तके घेऊन त्यांनी सहारनपूर सोडले. माझी बाजू सर्वोच्च न्यायालय ऐकून घेईल व मला न्याय मिळेल अशी आशा प्रवीणकुमार यांनी व्यक्त केली. 

Web Title: 'They' set foot in Delhi to seek justice, police probe into conversion case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.