शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

गॅरंटीमुळे ते मला शिव्या देताहेत; तरुण नेत्यांना काँग्रेस प्रोत्साहन देत नाही; पंतप्रधान मोदींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 09:56 IST

येथे भाजपच्या सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, आपण कधीही वैयक्तिक हल्ला केला नाही. परंतु घराणेशाहीच्या राजकारणाविरोधात आवाज उठविला आहे. आपण लोकांना दिलेली ‘गॅरंटी’ अंमलात आणण्यास उत्सुक आहोत, म्हणून काँग्रेस आणि मित्रपक्ष आता मला शिव्या देत आहेत.

संगारेड्डी (तेलंगणा) : काँग्रेस पक्ष तरुण नेत्यांना प्रोत्साहन देण्यास घाबरतो आणि ७५-८० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नेत्यांना संधी देतो, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव न घेता केली. घराणेशाही जपणारा पक्ष आपल्याला लक्ष्य करीत आहे. कारण आपण त्यांचे अनेक हजारो कोटी रुपयांचे घोटाळे उघड करीत आहोत, असा आरोपही त्यांनी केला.

येथे भाजपच्या सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, आपण कधीही वैयक्तिक हल्ला केला नाही. परंतु घराणेशाहीच्या राजकारणाविरोधात आवाज उठविला आहे. आपण लोकांना दिलेली ‘गॅरंटी’ अंमलात आणण्यास उत्सुक आहोत, म्हणून काँग्रेस आणि मित्रपक्ष आता मला शिव्या देत आहेत.

काँग्रेसला भीती वाटते म्हणून...काँग्रेसवर ताशेरे ओढताना ते म्हणाले की, पक्षाने कधीही ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला बढती दिली नाही. जर त्यांना कुणाला नियुक्त करायचे असेल, तर ते ७५-८० वर्षांच्या, ८५ वर्षांच्या व्यक्तीला नियुक्त करतील. 

त्यांना भीती वाटते, की एखादा ५० वर्षांचा माणूस आला आणि त्याने मागे टाकले तर कुटुंबाचे काय होईल? मोदी यांनी मंगळवारी हैदराबाद येथील श्री उज्जयिनी महाकाली मंदिरात देशवासीयांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.

७,२०० कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटनपंतप्रधान मोदी यांनी संगारेड्डी येथे ७,२०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. हे प्रकल्प रस्ते, रेल्वे, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यांसारख्या अनेक महत्त्वाच्या क्षेत्राशी संबंधित आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण