शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 10:06 IST

४३ वर्षीय अनादी मिश्रा अल्जेरियातील अन्नाबा शहरातील एका स्पंज आयर्न कंपनीत काम करत होते. १८ जुलै रोजी या आयर्न कंपनीत झालेल्या स्फोटात त्यांचे निधन झाले.

चांगली कमाई करून आपल्या कुटुंबाला एक चांगलं आयुष्य द्यावं, अशी प्रत्येकाची ईच्छा असते. काही लोक तर यासाठी घरापासून दूर परदेशात जातात. उत्तर प्रदेशातील एका सामान्य कुटुंबातील मुलाने देखील असंच स्वप्न पाहिलं पण, आता त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमधील भितरगाव ब्लॉकमधील बारी गावातील ४३ वर्षीय अनादी मिश्रा अल्जेरियातील अन्नाबा शहरातील एका स्पंज आयर्न कंपनीत काम करत होते. १८ जुलै रोजी या आयर्न कंपनीत झालेल्या स्फोटात त्यांचे निधन झाले. ते तिथे ऑपरेटर म्हणून काम करत होते. १२ दिवस उलटूनही त्यांचे पार्थिव गावात पोहोचू शकले नाही. 

मुलाच्या पार्थिवाची वाट पाहणारे वृद्ध वडील राजेंद्र मिश्रा (६८) यांचे बुधवारी निधन झाले. मुलाच्या मृत्युनंतर आता वडिलांच्या मृत्युने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

१८ जून रोजी अनादी मिश्रा यांनी अल्जेरियाच्या स्पंज आयर्न कंपनीत ऑपरेटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अवघ्या एका महिन्यानंतर, १७ जुलै रोजी कारखान्यात झालेल्या मोठ्या स्फोटात ते गंभीर जखमी झाले. दुसऱ्या दिवशी १८ जुलै रोजी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले. कुटुंबाला ही बातमी कळताच सर्वांना धक्का बसला. अनादी यांचा धाकटा भाऊ अर्पित मिश्रा यांनी सांगितले की, त्यांचे वडील राजेंद्र मिश्रा आधीच कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांच्या मुलाच्या मृत्यूच्या बातमीने ते पूर्णपणे खचून गेले होते. त्यांनी खाणे-पिणे बंद केले आणि शेवटपर्यंत मुलाचा मृतदेह येण्याची वाट पाहत राहिले.

१२ दिवसांनंतरही मृतदेह घरी पोहोचला नाही!१२ दिवसांनंतरही अनादीचा मृतदेह भारतात आणता आला नाही. या प्रतीक्षेने हळूहळू कुटुंबाच्या मनावर आघात होत होते.यातच बुधवारी राजेंद्र मिश्रा यांचेही निधन झाले. आता अनादीची आई कांती मिश्रा, वहिनी सुनीता, बहिणी पूनम, प्रीती, स्वाती आणि पुतण्या विभू आणि रिभू, संपूर्ण कुटुंब दुःखात बुडाले आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

प्रशासनाकडून प्रतिसाद नाही!अर्पित म्हणाले की, मृतदेह आणण्यासाठी प्रशासन आणि कंपनीशी वारंवार संपर्क साधला जात आहे, परंतु अद्याप कोणतेही ठोस उत्तर मिळालेले नाही. कुटुंबाला आता फक्त एवढंच वाटतंय की अनादीचा मृतदेह लवकरात लवकर गावात पोहोचावा, जेणेकरून त्याचा शेवटचा निरोप सन्मानाने देता येईल. या दुःखद घटनेने संपूर्ण गाव हादरून गेले आहे.   

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशInternationalआंतरराष्ट्रीयDeathमृत्यू