तीन फूट बर्फात त्यांनी केले संचलन

By Admin | Updated: January 26, 2017 20:37 IST2017-01-26T17:46:07+5:302017-01-26T20:37:09+5:30

हिमाचलमधील केयलाँग येथे मैदानात साचलेल्या तीन फूट बर्फामध्ये ध्वजवंदन करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला

They carried three-foot snow in the sky | तीन फूट बर्फात त्यांनी केले संचलन

तीन फूट बर्फात त्यांनी केले संचलन

ऑनलाइन लोकमत
सिमला, दि. 23 -  68 वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात उत्साहात साजरा झाला. त्यासाठी पोलीस, सैनिकांचे संचलन, सांस्कृतिक कार्यक्रमांची देशभरात रेलचेल होती. पण उत्तरेकडील राज्यात  खराब हवामानामुळे प्रजासत्ताक दिनाच्या आयोजनात अडचणी आल्या. पण हिमाचल प्रदेशमध्ये अशा बिकट परिस्थितीतही ध्वजवंदन आणि संचलनाचे  कार्यक्रम आयोजित करण्यात आले. हिमाचलमधील केयलाँग येथे मैदानात साचलेल्या तीन फूट बर्फामध्ये ध्वजवंदन करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी पोलिसांनी दाट पसरलेल्या बर्फाच्या अडथळ्याला मात देत संचलन करून राष्ट्रध्वजाला दिमाखात सलामी दिली.

Web Title: They carried three-foot snow in the sky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.