शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सोनं, चांदी, रोख रक्कम नाही तर हुंड्यात मागितली किडनी, नकार दिला तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 16:16 IST

Dowry Case: गेल्या काही दिवसांपासून हुंडाबळीच्या बातम्या सातत्याने येत आहेत. अनेक प्रकरणांमध्ये दागदागिने, मालमत्ता, रोख रक्कम आदींच्या रूपात हुंडा मागितला जातो. मात्र बिहारमधील मुझफ्फरपूर येथे हुंड्याचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून हुंडाबळीच्या बातम्या सातत्याने येत आहेत. अनेक प्रकरणांमध्ये दागदागिने, मालमत्ता, रोख रक्कम आदींच्या रूपात हुंडा मागितला जातो. मात्र बिहारमधील मुझफ्फरपूर येथे हुंड्याचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. मुझफ्फरपूर शहरातील मिठनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिप्ती नावाच्या एका महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले. सासरच्या मंडळींनी मला माहेरहून हुंडा आणण्यास सांगितले. तसेच मी जेव्हा हुंडा आणू शकले नाही तेव्हा सासरच्या मंडळींनी पतीच्या उपचारांसाठी किडनी देण्याची मागणी केली. मी जेव्हा किडनी देण्यास मनाई केली तेव्हा मला मारहाण करण्यात आली. तसेच घरातून बाहेर काढण्यात आले, असा आरोपही या महिलेने केला.

दिप्ती हिने सांगितले की, माझं लग्न २०२१ मध्ये बोचहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका तरुणासोबत झालं होतं. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस आनंदात गेले. मात्र काही महिन्यांनंतर सासरच्या मंडळींचं वर्तन बदलू लागलं. ते माहेरहून पैसे, दुचाकी आणण्यासाठी माझ्यावर सतत दबाव आणू लागले. तसेच मी कुठल्याच कामाची राहिलेली नाही, असे टोमणे मारू लागले.

यादरम्यान, लग्नाला दोन वर्षं झाल्यानंतर माझ्या पतीची एक किडनी खराब झाली असल्याचे मला समजले. त्यानंतर सासरच्या मंडळींनी तुला जर माहेरहून पैसे आणता येत नसतील तर तुझी एक किडनी तुझ्या पतीला दे, असे सांगून तगादा लावला. मात्र मी जेव्हा किडनी देण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी मला घराबाहेर काढले.

दरम्यान, दिप्ती हिने माहेरी गेल्यानंतर महिला पोलीस ठाण्यात धाव घेत तक्कार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही पक्षांना बोलावून प्रकरण सामोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र तडजोड होऊ शकली नाही. दिप्ती हिला घटस्फोट हवा आहे. मात्र तिचा पती तिला घटस्फोट देण्यास तयार नाही, त्यामुळे  घटस्फोटावर दोघांचीही सहमती होऊ शकली नाही. त्यानंतर या महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तसेच पतीसह सासरच्या चार जणांवर आरोप करत त्यांना आरोपी बनवले. आता या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.  

टॅग्स :dowryहुंडाCrime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश