असे आहेत वाहन चोरीचे गुन्हे

By Admin | Updated: February 5, 2016 00:32 IST2016-02-05T00:32:40+5:302016-02-05T00:32:40+5:30

शहरात दुचाकी,कार, रिक्षा व ट्रक यासारख्या वाहनांची चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. वर्षभरात डिसेंबर अखेर शहरातून ९८ वाहने चोरी झाल्याची अधिकृत नोंद पोलीस स्टेशनच्या डायरीला आहे, तर असे अनेक वाहने चोरी झाले आहेत की त्याची नोंदच झालेली नाही.शहरात ८५ दुचाकी, ९ कार,एक रिक्षा व चार ट्रकची चोरी झाल्याबाबतचे गुन्हे पोलीस स्टेशनला दाखल आहेत. त्यापैकी दोन ट्रक व एक कार पोलिसांना तपासात मिळून आलेली आहे. बहुतांश गुन्‘ांच्या तपासात प्रगतीच झालेली नाही.

These are vehicle theft crimes | असे आहेत वाहन चोरीचे गुन्हे

असे आहेत वाहन चोरीचे गुन्हे

रात दुचाकी,कार, रिक्षा व ट्रक यासारख्या वाहनांची चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. वर्षभरात डिसेंबर अखेर शहरातून ९८ वाहने चोरी झाल्याची अधिकृत नोंद पोलीस स्टेशनच्या डायरीला आहे, तर असे अनेक वाहने चोरी झाले आहेत की त्याची नोंदच झालेली नाही.शहरात ८५ दुचाकी, ९ कार,एक रिक्षा व चार ट्रकची चोरी झाल्याबाबतचे गुन्हे पोलीस स्टेशनला दाखल आहेत. त्यापैकी दोन ट्रक व एक कार पोलिसांना तपासात मिळून आलेली आहे. बहुतांश गुन्‘ांच्या तपासात प्रगतीच झालेली नाही.
अशी आहे मोडस ऑपरेंडी
दुचाकी चोरताना त्यासाठी बनावट किंवा मास्टर चाबीचा वापर केला जातो. मुख्य बाजारपेठ, दाट वस्ती अशा ठिकाणी चोरटे वाहनांवर लक्ष ठेवतात. एखाद्या व्यक्तीने वाहन लावल्यानंतर टोळीतील एक जण लांब अंतरावरुन मालकाचा पाठलाग करतो. तो मालक कुठे जातो तेथे किती वेळ थांबतो यावर लक्ष ठेवून दुसर्‍या सहकार्‍याला मोबाईलवरुन त्याची माहिती कळवितो. बनावट चाबीचा वापर झाला नाही तर वायर काढून स्वीच सुरु करुन दुचाकी लांबविली जाते. चारचाकी वाहनांसाठी मास्टर चाबीचाच वापर केला जातो.

असे आहेत दुचाकी चोरीचे गुन्हे (कंसात कार व ट्रक)
जळगाव शहर -३३ (१ कार २ ट्रक)
जिल्हा पेठ - २० (१ रिक्षा १ कार)
शनी पेठ- ०३
एमआयडीसी -०४ (३ कार २ ट्रक)
जळगाव तालुका - ०२
रामानंद नगर - १३ (४ कार)

Web Title: These are vehicle theft crimes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.