हे आहेत 20 ते 50 हजारमधील हॉट लॅपटॉप !
By Admin | Updated: April 18, 2017 17:45 IST2017-04-18T17:41:25+5:302017-04-18T17:45:04+5:30
सध्याच्या टेक्नोसॅव्ही जगात अनेक लॅपटॉप बाजारात आले आहेत. यामध्ये अनेक नामवंत कंपन्याचे लॅपटॉप आपल्याला कमी किंमतीपासून ते अधिकाअधिक किंमतीपर्यंत बाजारात पाहायला मिळतील.

हे आहेत 20 ते 50 हजारमधील हॉट लॅपटॉप !
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - सध्याच्या टेक्नोसॅव्ही जगात अनेक लॅपटॉप बाजारात आले आहेत. यामध्ये अनेक नामवंत कंपन्याचे लॅपटॉप आपल्याला कमी किंमतीपासून ते अधिकाअधिक किंमतीपर्यंत बाजारात पाहायला मिळतील.
मॉक्रोसॉफ्ट, एसर, एचपी, डेल, लिनोव्हो अशाच काही कंपन्यांचे अगदी 20 हजारांपासून ते 50 हजार रुपयांच्या रेंजमधील लॅपटॉप आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
जाणून घ्या, खालील 20,000 ते 50,000 रुपयांपर्यंतचे हॉट लॅपटॉप...
9) एचपी 15-AY503TU (Rs 38,990)
एचपी कंपनीचा HP 15-AY503TU हा लॅपटॉप 40 हजार रुपयांच्या रेंजमधील आहे. 6th जनरेशन इंटेल कोअर i5 प्रोसेसर असलेल्या या लॅपटॉपमध्ये 4 जीबी रॅम, 1 टीबी हार्ड ड्राईव्ह आणि 4 सेल बॅटरी आहे. तसेच, हा लॅपटॉप लाईटवेट असून 15.6 इंचाचा एचडी डिस्प्ले आहे. तर, 2 x USB 2.0 port, 1 x USB 3.0 port, HDMI, Ethernet, optical drive आणि विन्डोज 10 ऑपरेटिंग सिस्टिम आहे.