शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 13:34 IST

मेघालयमध्ये झालेल्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचा तपास अजूनही सुरूच आहे. या प्रकरणात काही नवे धक्कादायक खुलासे होत आहेत.

मेघालयमध्ये झालेल्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचा तपास अजूनही सुरूच आहे. या प्रकरणात काही नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. या गुन्ह्यात सामील असणाऱ्या मुख्य आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, यात आणखी काही लोकांची नावे देखील समोर आली आहेत. सध्या पोलीस ताब्यात घेतलेल्या गुन्हेगारांची चौकशी करत आहेत. दरम्यान, या प्रकरणात अजूनही ५ गोष्टी गहाळ असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. या ५ गोष्टी हत्येशी संबंधित असून, त्या नेमक्या कुठे गेल्या याचा तपास केला जात आहे.

राजा रघुवंशी हत्या प्रकरणात त्याची पत्नी सोनम रघुवंशी, तिचा प्रियकर राज कुशवाह, यांच्यासोबत आणखी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यासोबतच शिलाँग पोलिसांनी हत्येदरम्यान वापरलेले धारदार शस्त्र, आरोपींनी घातलेले कपडे यासह काही महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. परंतु, या प्रकरणातील अत्यंत महत्त्वाच्या पुराव्यांपैकी एक पिस्तूल, पाच लाख रुपयांची रक्कम, लॅपटॉप, राजाची सोन्याची साखळी आणि अंगठी या गोष्टी अद्याप गायब आहेत, ज्याचा शोध पोलीस घेत आहेत.  

लोकेन्द्र सिंह तोमर पोलिसांच्या ताब्यात!

या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी सोनमला लपण्यासाठी मदत करणाऱ्या फ्लॅट मालक लोकेन्द्र सिंह तोमर याला तीन दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर घेतले आहे. त्याच्यावर पिस्तूल, पैसे आणि दागिने चोरल्याचा आरोप आहे. लोकेन्द्र तोमर हा देवासा नाका येथील हिराबागमध्ये असेलेल्या फ्लॅटचा मालक आहे. त्याच्या याच फ्लॅटमध्ये सोनम ३१ मे ते ८ जून दरम्यान लपून बसली होती. याच फ्लॅटमध्ये तिने आपली काळी बॅग देखील लपवली होती. सोनमचा प्रियकर राज कुशवाहा याच्या सांगण्यावरून विकी चौहान याने सोनमला ही बॅग दिली होती. अटक करताच त्याने या बॅगेचा उल्लेख केला होता.

राजाला मारण्यासाठी सुरुवातीला पिस्तूलचा वापर होणार होता. यासाठी त्यांनी एक पिस्तूल खरेदी केले होते. मात्र, ऐनवेळी त्यांनी दाओ हे शस्त्र वापरुन राजाचा खून केला. तर, त्या काळ्या बॅगमध्ये ५ लाख रुपये होते. बॅगेचा शोध घेत असताना पोलिसांनी प्रथम प्रॉपर्टी ब्रोकर सिलोम जेम्सला ताब्यात घेतले. लोकेंद्रच्या दबावाखाली, सिलोमने आणि गार्ड बल्लू उर्फ बलवीर अहिरवारने १० जून रोजी फ्लॅटमधून सोनमची काळी बॅग बाहेर काढली. त्यांनी पोलिसांना सांगितले की ती बॅग निपानियातील एमआर-३ येथील कृष्णा विहार कॉलनीच्या मागे असलेल्या रिकाम्या प्लॉटवर जाळून टाकली होती.

लॅपटॉप आणि जळालेल्या बॅगेचे अवशेष सापडलेसिलोमने पोलिसांना सांगितले की, बॅगेत सापडलेला लॅपटॉप जवळच्या रिकाम्या प्लॉटमध्ये फेकून दिला होता. २३ जून रोजी सिलोमने दिलेल्या माहितीनुसार, शिलाँग पोलिसांनी जळालेल्या बॅगेचे अवशेष जप्त केले आणि त्यांना तपासासाठी सेंट्रल लॅबमध्ये पाठवले. सिलोमने कबूल केले की बॅगेत पिस्तूल आणि ५ लाख रुपये नव्हते आणि फ्लॅटची दुसरी चावी लोकेन्द्रकडे होती, ज्याने त्यापूर्वीच फ्लॅट उघडला होता. या माहितीच्या आधारावर, २३ जून रोजी शिलाँग पोलिसांनी ग्वाल्हेर पोलिसांच्या मदतीने लोकेन्द्रला अटक केली. मंगळवारी लोकेन्द्र तोमरला न्यायालयात हजर करण्यात आले आणि तीन दिवसांची ट्रान्झिट रिमांड घेण्यात आली.

पुढील तपास आणि महत्त्वाचे पुरावेआज शिलाँग पोलीस सिलोम जेम्स आणि बल्लू उर्फ बलवीर यांना ग्वाल्हेरमार्गे शिलाँगला घेऊन जातील. लोकेन्द्र सिंह तोमर याची सिलोम जेम्स आणि गार्ड बल्लू उर्फ बलवीर अहिरवार यांच्यासमोर चौकशी केली जाईल. काळ्या बॅगेतून गायब झालेली रोकड, पिस्तूल, दागिने आणि लॅपटॉप कुठे गेला याचा शोध घेतला जाईल. पोलिसांना संशय आहे की लॅपटॉपमध्ये काही डिजिटल पुरावे असू शकतात, जे हत्येचा मोठा पुरावा ठरू शकतात.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारDeathमृत्यू