या १७ दुकानांत दुकानदार आणि कॅमेराही नाही...
By Admin | Updated: April 12, 2016 19:54 IST2016-04-12T19:20:31+5:302016-04-12T19:54:32+5:30
जुन्या एअरपोर्ट रोडवर असलेल्या भारत गोल्फ अपार्टमेंटमध्ये असलेल्या दुकानात कोणताही विक्रेता, दुकानदार अथवा कॅमेरा नाही तरीही रोज दुकानातील माल विकला जातो. त्यामुळे हे दुकान चर्चेत आले आहे.

या १७ दुकानांत दुकानदार आणि कॅमेराही नाही...
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. १२ - जुन्या एअरपोर्ट रोडवर असलेल्या भारत गोल्फ अपार्टमेंटमध्ये असलेल्या दुकानात कोणताही विक्रेता, दुकानदार अथवा कॅमेरा नाही, तरीही रोज दुकानातील माल विकला जातो. त्यामुळे हे दुकान आता चर्चेत आले आहे. तुम्ही दुकानात या फ्रीज उघडा आणि तुम्हाला पाहिजे ती गोष्ट घ्या जसे, इडली/समोसा/डोसा/चपाती बनवण्याचं पीठ. हे सामान घेतल्यानंतर सामानाचे पैसे दरवाज्याजवळ असणाऱ्या छोट्या बॉक्स (पीगी बॉक्स) मध्ये टाकावे.
या दुकानात ग्राहकाकडे पाहण्यासाठी कोणीही नाही. दुकान पूर्णपणे ग्राहकाच्या विश्वासावर अवलंबून आहे. बंगळुरूमध्ये फक्त हे एक नाही तर तब्बल 17 दुकाने कार्यरत आहेत. ग्राहकाकडून घेण्यात येणारा मोबदला व त्याबदल्यात विक्रेत्याकडून दिली जाणारी वस्तू वा सेवेचा दर्जा यावरून ग्राहकाचे समाधान ठरते. त्यामुळे ग्राहकाचे समाधान आणि व्यावसायिक नफा या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असल्याने ग्राहक आणि व्यावसायिक हित या दोन्हींचा ताळमेळ घालणे कोणत्याही व्यवसायासाठी आवश्यक आहे. आणि हाच ताळमेळ इथे आपल्याला दिसतो आहे.
आयडी फूडच्या मालकाने या दुकानाची सुरुवात केली आहे. भविष्यात अशा प्रकारची दुकाने मुंबई, चेन्नई, कोलकातासारख्या शहरात पाहण्यास मिळतील.