शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

म्हणून वाराणसी येथून लढवली नाही लोकसभा निवडणूक, प्रियंका गांधी यांनी सांगितले कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 14:07 IST

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात वाराणसी येथून लोकसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती.

नवी दिल्ली - काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात वाराणसी येथून लोकसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र प्रियंका गांधी यांना निवडणुकीच्या रिंगणात न उतरवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. तेव्हापासून प्रियंका गांधी यांनी वारणसी येथून निवडणूक न लढवण्याचा निर्णय का घेतला याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, वाराणसी येथून निवडणूक का लढवणली नाही याचे कारण प्रियंका गांधी यांनी दिले आहे. माझ्या खांद्यावर संपूर्ण उत्तर प्रदेशमधील प्रचाराची जबाबदारी आहे. एका नाही तर 41 मतदारसंघात पक्षाला विजयी करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे एका ठिकाणी राहून मला हे शक्य होणार नाही, असे प्रियंका गांधी म्हटले आहे.  28 मार्च रोजी रायबरेलीमध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी या गेल्या असता कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्याची विनंती त्यांना केली. त्यावेळी निवडणूक लढवायची तर मी वाराणसी येथून लढवू का असा प्रतिप्रश्न त्यांनी कार्यकर्त्यांना विचारला होता. ही चर्चा अनौपचारिक स्वरूपाची होती. मात्र त्यानंतर प्रियंका गांधी या खरोखरच वाराणसी येथून निवडणूक लढवणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. तसेच प्रियंकांनी वाराणसी येथून निवडणूक लढवल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर मोठे आव्हान उभे राहील, अशी शक्यताही वर्तवण्यात येत होती.  दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते आमदार दीपक सिंह यांनी प्रियंका गांधी या वाराणसी येथून निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित असल्याचा दावा केला होता. प्रियंका गांधींनी वाराणसी येथून निवडणूक लढवण्याचे ठरवले असून, त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया एक दोन दिवसांत सुरू होईल, असा दावा केला होता. तसेच प्रियंका गांधीही आपण मोदींविरोधात लढण्यास सज्ज असल्याचे वारंवार सांगत होत्या. त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा हेही प्रियका गांधी निवडणूक लढण्यास तयास असल्याचा दावा करत होता. मात्र या सर्व शक्यतांना पूर्णविराम देताना काँग्रेसने वाराणसी येथून अजय राय यांना उमेदवारी दिली. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीvaranasi-pcवाराणसीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019