फुटीर गिलानीला संपविण्याचा डाव होता -दुलत

By Admin | Updated: July 7, 2015 23:10 IST2015-07-07T23:10:38+5:302015-07-07T23:10:38+5:30

पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संघटनेच्या कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी सुरक्षा दलाकडून जम्मू-काश्मीरमधील फुटीरवादी नेते सईद अली शाह गिलानी यांना संपविण्याचा कट आखण्यात आला

There was an end to the fierce Gilani - bliss | फुटीर गिलानीला संपविण्याचा डाव होता -दुलत

फुटीर गिलानीला संपविण्याचा डाव होता -दुलत

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संघटनेच्या कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी सुरक्षा दलाकडून जम्मू-काश्मीरमधील फुटीरवादी नेते सईद अली शाह गिलानी यांना संपविण्याचा कट आखण्यात आला; पण हा कट प्रत्यक्षात येण्याआधीच गुंडाळण्यात आला, असा गौप्यस्फोट रॉचे माजी प्रमुख ए.एस. दुलत यांनी केला आहे.
भारतीय गुप्तचर संघटना रॉचे माजी प्रमुख दुलत यांनी आपल्या कारकीर्दीतील घटनांवर पुस्तक लिहिले असून, त्यात ही माहिती देण्यात आली आहे. सईद अली शाह गिलानी आयएसआयच्या जवळ होते, असेही ते म्हणाले.

Web Title: There was an end to the fierce Gilani - bliss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.