फुटीरवादी आलमच्या सुटकेत काही गैर नाही
By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:42+5:302015-03-14T23:45:42+5:30
जम्मू-काश्मीर: मेहबुबा मुफ्ती यांचा युक्तिवाद

फुटीरवादी आलमच्या सुटकेत काही गैर नाही
ज ्मू-काश्मीर: मेहबुबा मुफ्ती यांचा युक्तिवादनवी दिल्ली : जम्मू-काश्मिरातील कट्टर फुटीरवादी नेता मसरत आलम याच्या सुटकेत काहीही गैर नाही. त्याने कधी बंदूक हाती घेतली नाही. तो इ.स.२०१० सालच्या हिंसक दगडफेक आंदोलनाची निर्मिती आहे. या आंदोलनाचे नेतृत्व त्याने केले होते, असा युक्तिवाद राज्यातील सत्ताधारी पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीच्या (पीडीपी)अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी शनिवारी येथे केला.जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने आलमची सुटका करून केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.गेल्या आठवड्यात आलमच्या सुटकेवरून संसदेत प्रचंड गदारोळ झाला होता. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या असंतोषात आपलेही स्वर मिसळीत ही सुटका अमान्य असल्याचे म्हटले होते. राज्यातील सत्ताधारी पीडीपी आणि भाजपा युतीतही यामुळे तणाव निर्माण झाला होता.इंडिया टुडेच्या परिसंवादात मेहबुबा मुफ्ती यांनी आपली उपरोक्त भूमिका मांडली. आलमची सुटका करणे ही एक चूक होती काय? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर यात काहीही चुकीचे नाही, असे त्यांचे उत्तर होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे ही जर चूक मानली जात असेल तर आम्ही काय करू शकतो? काश्मीरचा प्रश्न येतो तेव्हा तुम्ही तुमच्याच सर्वोच्च न्यायालयाचा आदेश फिरविण्याचा प्रयत्न करता. तुम्ही असे कसे करू शकता? असा उलट सवाल मेहबुबा यांनी उपस्थित केला. एखादा नवा आधार असेल तरच आलमला पुन्हा ताब्यात घेता येईल, या न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ यामागे होता. न्यायालयाच्या निर्णयाबाबत दुहेरी मापदंड अवलंबले जाऊ नयेत अशी इच्छा व्यक्त करताना त्या म्हणाल्या, तुम्ही यादीतील २८ वा क्रमांक उचलून अफजल गुरूला फासावर लटकविता आणि हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्याचे सांगता. परंतु हेच सर्वोच्च न्यायालय आलमची सुटका करा, त्याला कुठल्याही आरोपाशिवाय बंदिस्त ठेवण्यात आले आहे असे सांगते तेव्हा मात्र तुम्ही त्यावर प्रश्न उपस्थित करता. कोटमसरत आलमची सुटका झाली तेव्हा लोकांनी सर्वोच्च न्यायालय या निर्णयाप्रत कसे पोहोचले यावर चर्चा करायला हवी होती. देशातील सुरक्षेबाबत दृष्टिकोनाच्या एकदम विपरीत निर्णय कसा आला याचा विचार होणे अपेक्षित होते. मसरत आलमलाही हे उमगले नसेल. परंतु मला याची खात्री आहे की जेव्हा तो अंतर्मनातून याचा विचार करेल तेव्हा त्याला हे कळेल. अथवा त्याच्या सभोवतालचे लोक निश्चितच हे म्हणत असतील की हेच भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे. मेहबुबा मुफ्ती, अध्यक्ष ,पीडीपी, जम्मू-काश्मीरजम्मू-काश्मीर सरकार अस्थिर करण्याचा कटउपमुख्यमंत्री निर्मलसिंग यांचा आरोपजम्मू: प्रशासनातील काही लोक पीडीपी-भाजपा सरकार अस्थिर करण्याचा कट रचत असल्याचा आरोप जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मलसिंग यांनी शनिवारी केला. हे कटकारस्थान रचणार्यांविरुद्ध कारवाई केली जाईल,असेही त्यांनी स्पष्ट केले. सिंग यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की राज्याच्या ध्वजासंदर्भात सरकारला अस्थिर करण्याचा एक मोठा प्रयत्न झाला. आम्ही सरकारअंतर्गत या मुद्यावर चर्चा केली तेव्हा हे स्पष्ट झाले.