कुंटणखान्यात केलेला सेक्स गुन्हा नाही - केरळ हायकोर्ट
By Admin | Updated: February 27, 2016 17:42 IST2016-02-27T17:22:36+5:302016-02-27T17:42:24+5:30
कुंटणखान्यातील लैंगिक संबंध हा गुन्हा होऊ शकत नाही असा महत्त्वपूर्ण निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे.

कुंटणखान्यात केलेला सेक्स गुन्हा नाही - केरळ हायकोर्ट
>ऑनलाइन लोकमत
कोची, दि. 27 - कुंटणखान्यातील लैंगिक संबंध हा गुन्हा होऊ शकत नाही असा महत्त्वपूर्ण निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्याखाली तामिळनाडूच्या तीन नागरिकांविरोधातील तिरुवनंतपूरम येथे दाखल केलेला खटला केरळ उच्च न्यायालयाने रद्द केला आहे.
विजयकुमार, माणिक्यवासकाम आमि मार्टिन आरोग्यस्वामी यांच्याविरोधात कलम 3, 4(1) आणि 7 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. कुंटणखाना चालवणे किंवा चालवण्यास जाग देणे यासाठी कलम 3 लागतं. देहविक्री करणा-या महिलेच्या उत्पन्नातून कमाई करणे यासाठी कलम 4 लागतं. तर, सार्वजनिक जागेत किंवा जवळ वेश्याव्यवसाय यासाठी कलम 7 लागू होतं.
त्यामुळे या आरोपींच्याविरोधात असलेले सगळे आरोप दाखल करून घेतले तरी त्यांनी यापैकी एकही गुन्हा केला नसल्याचे मत कोर्टाने नोंदवले आहे. त्यामुळे अगदी कुंटणखान्यामध्ये एखादी व्यक्ती लैंगिक संबंध करत असेल तरी ती व्यक्ती गुन्हेगार नाही, असे स्पष्टीकरण न्यायमूर्ती के. हरीलाल यांनी दिले आहे.