माझ्या हातात निकाल नाही -बेदी
By Admin | Updated: February 10, 2015 03:50 IST2015-02-10T03:50:22+5:302015-02-10T03:50:22+5:30
निकालाबाबत मी निराश नाही, कारण तो माझ्या हातात नाही. केवळ कर्मच माझ्या हातात आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी दिली आहे.

माझ्या हातात निकाल नाही -बेदी
नवी दिल्ली : निकालाबाबत मी निराश नाही, कारण तो माझ्या हातात नाही. केवळ कर्मच माझ्या हातात आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी दिली आहे.
गेल्या १७ दिवसांत मी माझे सर्व दिले आहे. खूप मेहनत घेऊन सर्वोत्तम देणे हाच माझा स्वभाव आहे. मी भ्याड असते तर आयपीएस अधिकारी बनले नसते, असेही त्या म्हणाल्या.
तर माकन यांचा राजीनामा सदर बाजार मतदारसंघातून पराभव झाल्यास अजय माकन यांनी काँग्रेसचे सरचिटणीसपद किंवा संपर्क विभागाच्या प्रमुखपदाचा राजीनामा देण्याची तयारी केली आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)