कोलकाता : भाजपाला रोखण्याच्या दृष्टीने तृणमूल काँग्रेससोबत हातमिळवणी करण्याच्या सर्व शक्यता माकपासह डाव्या पक्षांनी शनिवारी धुडकावून लावल्या़
शुक्रवारी एका मुलाखतीत डाव्यांसोबत आघाडी करण्याची तयारी आहे का? असा प्रश्न तृणमूल अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना विचारण्यात आला होता़ यावर त्यांनी राजकारणात डाव्यांसह कुणीही ‘अस्पृश्य’ नाही, असे म्हटले होत़े धर्माध शक्तींना रोखण्यासाठी प्रसंगी आम्ही डाव्यांशी चर्चा करू शकतो़ चर्चा करण्यात आम्हाला कुठलीही अडचण नाही, असे त्या म्हणाल्या होत्या़
ममतांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना डाव्या पक्षांनी तृणमूलसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्ट केल़े तृणमूल काँग्रेस वा ममता बॅनर्जी यांच्यासोबत युतीचा प्रश्नच नाही़ त्यांच्या ध्येयधोरणांमुळे भाजपाला प़ बंगालमध्ये पाय रोवण्याची संधी मिळाली आह़े आम्हाला भाजपाविरुद्ध लढायचे असेल, तर आम्ही स्वबळावर लढू, अशी प्रतिक्रिया माकपा नेते गुरुदास दासगुप्ता यांनी दिली़ फॉरवर्ड ब्लॉक आणि आरएसपी या अन्य डाव्या पक्षांनीही तृणमूलसोबत जाण्याच्या शक्यता नाकारल्या़ तथ्यहीन विधानांवर प्रतिक्रिया देण्याला काहीही अर्थ नाही़ तृणमूलसोबत युती कधीही शक्य नाही, असे फॉरवर्ड ब्लॉकचे महासचिव देबब्रत विश्वास म्हणाल़े (वृत्तसंस्था)
4भाजपाला रोखण्याच्या दृष्टीने राजकारणात डाव्यांसह कुणीही ‘अस्पृश्य’ नाही, या ममता बॅनज्रीच्या वक्त व्यावर भाजपाने जोरदार टीका केली़ ममता बॅनर्जी यांचे हे वक्तव्य पश्चिम बंगालमध्ये भाजपा जम बसवत असल्याचे द्योतक आह़े राज्यात भाजपाच्या उदयाने ममता मनातून घाबरल्या आहेत, असे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सिद्धार्थनाथ म्हणाल़े