शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

हेरगिरी प्रकरणात चौकशीचा प्रस्ताव नाही - केंद्र सरकार

By admin | Updated: May 9, 2014 13:30 IST

गुजरातमधील तरुणीवर पाळत ठेवल्याप्रकरणी चौकशी समिती नेमण्याचा विचार नाही असे केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टासमोर स्पष्ट केले आहे. यामुळे निवडणूकीपूर्वी मोदींना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ९ - गुजरातमधील तरुणीवर पाळत ठेवल्याप्रकरणी चौकशी समिती नेमण्याचा प्रस्ताव नाही असे केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टासमोर स्पष्ट केले आहे. यामुळे निवडणूकीपूर्वी मोदींना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
बंगळुरुतील आर्किटेक्ट तरुणीवर नरेंद्र मोदींच्या आदेशावरुन गुजरात पोलिसांनी पाळत ठेवल्याचा दावा एका स्टिंग ऑपरेशमध्ये करण्यात आला होता.  सरकारी यंत्रणेचा वापर करुन एका महिलेवर पाळत ठेवल्याने नरेंद्र मोदींवर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली होती. या संदर्भात गुजरात सरकारने राज्यस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून त्यापाठोपाठ केंद्र सरकारनेही मोदींची न्यायालयीन चौकशीचा निर्णय घेतला होता. या संदर्भात १६ मेपूर्वी उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची चौकशी समिती नेमू असे केंद्रीय कायदामंत्री कपिल सिब्बल यांनी सांगितले होते. यानंतर संबंधीत तरुणीच्या वडिलांनी या चौकशीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टासमोर केंद्र सरकारने त्यांची बाजू मांडली. यात हेरगिरी प्रकरणात चौकशी समिती नेमण्याचा प्रस्ताव नाही असे केंद्र सरकारने कोर्टासमोर स्पष्ट केले. 
केंद्र सरकारने बाजू मांडल्यानंतर सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना राज्य सरकारच्या चौकशीवर निर्बंध आणण्यासाठी गुजरात उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले आहे. केंद्र सरकारने भूमिकेत बदल केल्याने मोदींना दिलासा मिळाला आहे.