भाजपात कुठलाही पेचप्रसंग नाही, एकजुटीने निवडणूक लढवणार- राजनाथ
By Admin | Updated: January 22, 2015 00:06 IST2015-01-22T00:06:49+5:302015-01-22T00:06:49+5:30
नवी दिल्ली-दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी किरण बेदी यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर पक्षात उमटलेल्या उलटसुलट प्रतिक्रियांच्या दरम्यान गृहमंत्री राजनाथसिंग यांनी, भाजपात कुठलाच पेचप्रसंग नसून, पक्ष एकजुटीने निवडणूक लढवणार असल्याचे प्रतिपादन केले आहे.

भाजपात कुठलाही पेचप्रसंग नाही, एकजुटीने निवडणूक लढवणार- राजनाथ
न ी दिल्ली-दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी किरण बेदी यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर पक्षात उमटलेल्या उलटसुलट प्रतिक्रियांच्या दरम्यान गृहमंत्री राजनाथसिंग यांनी, भाजपात कुठलाच पेचप्रसंग नसून, पक्ष एकजुटीने निवडणूक लढवणार असल्याचे प्रतिपादन केले आहे. किरण बेदी यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर केल्यानंतर पक्षातील असंतोषाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सिंग यांनी, भाजपात कुठलीच समस्या नाही. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीकरिता पक्षात एकजूट आहे असे म्हटले. पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी तिकीट वाटपाच्या मुद्यावरून दिल्लीतील भाजपा कार्यालयासमोर निदर्शने केली होती. कोणाला काही तक्रार असल्यास त्या कार्यकर्त्यांनी नेत्यांसोबत चर्चा करावी. त्याला मुद्दा बनविण्यात काही अर्थ नाही. पक्षाचे सर्व कार्यकर्ते दिल्लीतील निवडणुकीत आपले सहकार्य देतील असे सिंग यांनी म्हटले आहे. ६५ वर्षांच्या किरण बेदी मागील आठवड्यात भाजपात सामील झाल्या होत्या व सोमवारी त्यांच्या नावाची गोषणा मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीकरिता करण्यात आली होती.