शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी राजीनामा मागे घेण्याची अजिबात शक्यता नाही -वीरप्पा मोईली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 04:49 IST

राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्याची एक टक्केही शक्यता नाही, त्यामुळे पक्ष कार्यकारिणीला पुढील निर्णय घ्यावाच लागेल

हैदराबाद  - राहुल गांधीकाँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्याची एक टक्केही शक्यता नाही, त्यामुळे पक्ष कार्यकारिणीला पुढील निर्णय घ्यावाच लागेल, असे त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी म्हटले आहे.राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा, अशी काँग्रेस संसदीय पक्षाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत शशी थरूर यांच्यासह काही खासदारांनी त्यांना विनंती केली होती. मात्र, ती त्यांनी अमान्य केली होती. अध्यक्षपदी न राहण्याच्या आपल्या निर्णयावर राहुल गांधी ठाम आहेत. त्यामुळे या विषयावर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे वीरप्पा मोईली म्हणाले. ते म्हणाले की, राजकारणात काहीही घडू शकते. राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घेण्यास तयार नसल्याने नवा अध्यक्ष ठरवण्याआधी कार्यकारिणी परिस्थितीवर विचार करील. (वृत्तसंस्था)प्रियांकांकडे सूत्रे सोपविण्याबाबत मौन

राहुल गांधी यांना अध्यक्षपदी राहायचे नसेल तर त्यांनी पक्षाची सारी सूत्रे प्रियांका गांधी यांच्याकडे सोपवावीत, अशी विनंती काही काँग्रेस नेत्यांनी केली आहेत. त्याबद्दल कोणतेही भाष्य करण्यास वीरप्पा मोईली यांनी नकार दिला. काँग्रेस कार्यकारिणीच्या आगामी बैठकीत काय निर्णय होतो याची आपण वाट पाहू या, असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत झालेल्या सणसणीत पराभवानंतर काँग्रेसवर मोठी शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे, असे विधान कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांनी गेल्याच आठवड्यात केले होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसPoliticsराजकारण