्नरजा आंदोलनात सहभाग नाही

By Admin | Updated: April 25, 2016 00:27 IST2016-04-25T00:27:53+5:302016-04-25T00:27:53+5:30

पुणे : राज्य मार्ग परिवहन महामंडळामधील मान्यता प्राप्त कामगार संघटनाविरहीत सर्व संघटनांनी २६ एप्रिल रोजी होणार्‍या कामगार संघटनेच्या रजा आंदोलनातमध्ये व २७ एप्रिलच्या उपोषणामध्ये सहभागी न होण्याचे ठरविले आहे़ यामध्ये कामगार संघटना मान्यता प्राप्त सोडून इतर सर्व संघटनांनी कृती समिती स्थापन केली असून प्रवाशांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, म्हणून सर्व कर्मचारी या दिवशी कामावर हजर राहणार आहेत, असे राष्ट्रीय एसटी कामगार काँग्रेसचे पुणे विभागीय सचिव नामदेव कार्ले यांनी सांगितले़

There is no participation in the movement | ्नरजा आंदोलनात सहभाग नाही

्नरजा आंदोलनात सहभाग नाही

णे : राज्य मार्ग परिवहन महामंडळामधील मान्यता प्राप्त कामगार संघटनाविरहीत सर्व संघटनांनी २६ एप्रिल रोजी होणार्‍या कामगार संघटनेच्या रजा आंदोलनातमध्ये व २७ एप्रिलच्या उपोषणामध्ये सहभागी न होण्याचे ठरविले आहे़ यामध्ये कामगार संघटना मान्यता प्राप्त सोडून इतर सर्व संघटनांनी कृती समिती स्थापन केली असून प्रवाशांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, म्हणून सर्व कर्मचारी या दिवशी कामावर हजर राहणार आहेत, असे राष्ट्रीय एसटी कामगार काँग्रेसचे पुणे विभागीय सचिव नामदेव कार्ले यांनी सांगितले़
़़़़़़़़़़़़़
हाईड पार्क सोसायटीला पुरस्कार
पुणे : महानगर पालिकेच्या अग्निशामक दलाकडून दिला जाणारा अग्निशमन पुरस्कार मार्केटयार्ड येथील हाईड पार्क सोसायटीला महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते देण्यात आला़ अग्निशमन सप्ताहानिमित्त २०१६ पासून फायर सेफ सोसायटी पुरस्कार देण्याचे नियोजन करण्यात आले आहे़ काही दिवसांपूर्वी सोसायटीमधील दहाव्या मजल्यावर लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी सोसायटीतील सदस्यांनी मदत केली होती़
़़़़़़़़़़़़़़
कामगारांच्या वेतनासाठी जनजागृती फेरी
पुणे : महापालिकेच्या कंत्राटी कामगारांची ठेकेदारांकडून पिळवूणक केली जात असून त्यांना किमान वेतन कायद्यापासून वंचित ठेवले जात आहे़ कामगारदिनानिमित्त १ मे रोजी महापालिका कामगार युनियनच्या वतीने जागृती फेरी व कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे़महापालिकेत सफाई कामगारांपासून कॉम्प्युटर ऑपरेटरपर्यंत साडेपाच हजार कंत्राटी कामगार काम करतात़ शासनाने अधिसूचना काढली असली तर प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे युनियनच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले़
़़़़़़़़़़़़़़
स्वच्छता फेरी
पुणे : स्वच्छ छावणी, सुंदर छावणी, प्लॅस्टिक टाळा, अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी लष्कर परिसरात स्वच्छतेबाबत जनजागृती फेरी काढली़ या फेरीत शंभरहून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि पुणे कँट्रोंमेंटचे अधिकारी सहभागी झाले होते़ शिवाजी मार्केट परिसरातील स्टॉलधारकांना प्लॅस्टिक वापरु नका, आपला कचरा कुंडीतच टाका असा संदेश विद्यार्थ्यांनी दिला़ पुणे कँट्रोंमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव कुमार यांनी कँट्रोंमेंट परिसर अधिकाधिक स्वच्छ कसा राहील, या दृष्टीने प्रशासन प्रयत्न करीत असल्याचे सांगितले़

Web Title: There is no participation in the movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.