गोव्यात कॅसिनो बंद करण्याची गरज नाही
By Admin | Updated: January 3, 2015 01:31 IST2015-01-03T01:31:24+5:302015-01-03T01:31:24+5:30
मांडवी नदीत तसेच नव्या तरंगत्या कॅसिनोंना परवाने दिले जाणार नाहीत; पण सध्या असलेले कॅसिनो बंद करण्याची सरकारला गरज वाटत नाही, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शुक्रवारी येथे सांगितले.

गोव्यात कॅसिनो बंद करण्याची गरज नाही
पणजी : मांडवी नदीत तसेच नव्या तरंगत्या कॅसिनोंना परवाने दिले जाणार नाहीत; पण सध्या असलेले कॅसिनो बंद करण्याची सरकारला गरज वाटत नाही, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शुक्रवारी येथे सांगितले.
ते म्हणाले की, एखादा व्यवसाय बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाल्यानंतर तो अचानक बंद करता येत नाही. सरकारने कॅसिनो बंद केले, तर कॅसिनोचालक न्यायालयात जाऊ शकतात. सध्याचे कॅसिनो काँग्रेस सरकारच्या काळात सुरू झाले आहेत. त्या वेळीच त्यांना परवाने दिले होते. या कॅसिनोंकडून सरकारच्या तिजोरीत महसूल जमा होतो. ते बंद करावेत, असे सरकारला वाटत नाही. कॅसिनो जहाजांना मांडवी नदीपासून थोडे दूर अन्यत्र हलविण्याचा पर्याय सरकार विचारात घेऊ शकते. (खास प्रतिनिधी)
...तर पेट्रोलवरील
व्हॅट कमी करू
च्राज्याची आर्थिक स्थिती सुधारत असल्याचे पार्सेकर यांनी सांगितले.
च्पेट्रोलच्या दरात आम्ही प्रति लीटर तीन रुपयांची वाढ केली आहे, तरीही देशातील अन्य भागांपेक्षा गोव्यात पेट्रोल स्वस्तच आहे.
च्ज्या वेळी देशभरात पेट्रोलचा दर प्रति लीटर ७५ रुपये होता, तेव्हा आम्ही पेट्रोलवर ०.१ टक्के व्हॅट आकारत होतो.
च्यापुढे जर पेट्रोलचे दर वाढले, तर गोव्यात पेट्रोलवरील व्हॅट कमी करून दर नियंत्रणात ठेवू, असे ते म्हणाले.