उद्योगांसाठी पालिकांच्या परवानगीची गरज नाही

By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:41+5:302015-09-07T23:27:41+5:30

उद्योगांसाठी पालिकांच्या परवानगीची गरज नाही

There is no need for the permission of the corporation for the industries | उद्योगांसाठी पालिकांच्या परवानगीची गरज नाही

उद्योगांसाठी पालिकांच्या परवानगीची गरज नाही

्योगांसाठी पालिकांच्या परवानगीची गरज नाही
-मंत्रिमंडळाचा निर्णय :
मुंबई - औद्योगिक विकास क्षेत्रातील ज्या उद्योगांनी आपल्या उभारणीसाठी संबंधित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) अगोदरच परवानगी घेतलेली आहे, त्यांना संबंधित महापालिका, नगर परिषद, नगर पंचायतीची पुन्हा परवानगी घेण्याची अट रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. त्यात मुंबईचाही समावेश आहे.
मेक इन इंडिया कार्यक्र माच्या अनुषंगाने राज्यातही मेक इन महाराष्ट्र हा महत्त्वाकांक्षी कार्यक्र म राबविण्यात येत आहे. त्या दृष्टीने राज्यात गुंतवणूक वाढून औद्योगिक विकासाला चालना मिळावी यासाठी इझ ऑफ डुईंग बिझनेस धोरण अवलंबिण्यात आले आहे. उद्योजकांना व्यवसाय सुरु करणे सुलभ व्हावे, या दृष्टीने परवानग्यांची संख्या कमी करण्यात आली आहे.
याच धोरणाचा एक भाग म्हणून उद्योगासाठी एका सक्षम प्राधिकरणाकडून परवागनी घेतलेली असल्यास त्यास पुन्हा दुसर्‍या प्राधिकरणाची परवानगी घ्यावी, लागू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: There is no need for the permission of the corporation for the industries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.