शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

आसाममध्ये यावेळी मोदी लाट नाही -बद्रुद्दीन अजमल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 06:55 IST

बद्रुद्दीन अजमल म्हणाले, “आसाममध्ये भाजपचा पराभव होईल आणि त्यामुळे देशासाठी आसाममधील निवडणूक निर्णायक वळण देणारी ठरेल. हे घडण्यासाठी महाआघाडी जोरदार प्रयत्न करीत आहे.

नवी दिल्ली : आसाममध्ये २०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘मोदी लाट’ होती. ती यावेळी नाही, असे ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे (एआययूडीएफ) अध्यक्ष बद्रुद्दीन अजमल यांनी रविवारी म्हटले. भारतीय जनता पक्ष माझ्याकडे बोट दाखवून आणि मुस्लिमांना शत्रूच्या ठिकाणी दाखवून हिंदूंची मते एकत्रित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करून अजमल म्हणाले,  या प्रयत्नांत त्याला यश येणार नाही. (There is no Modi wave in Assam this time - Badruddin Ajmal)

एआययूडीएफवर जातिवाद केला जात असलेला आरोप निराधार असल्याचे सांगून अजमल यांनी आसाममध्ये माझ्या या पक्षापेक्षा कोणतीही संघटना जास्त धर्मनिरपेक्ष नाही, असा दावा केला. गेल्या निवडणुकीत एआयडीयूएफने मुस्लिमेंतरांना लक्षणीय असे प्रतिनिधित्व दिल्याचा उल्लेख त्यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला.बद्रुद्दीन अजमल म्हणाले, “आसाममध्ये भाजपचा पराभव होईल आणि त्यामुळे देशासाठी आसाममधील निवडणूक निर्णायक वळण देणारी ठरेल. हे घडण्यासाठी महाआघाडी जोरदार प्रयत्न करीत आहे. या महाआघाडीत आम्ही आणि काँग्रेस आहोत.” पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुड्डुचेरीत भाजपचा पराभव होईल. यातून संपूर्ण देशात संदेश जाईल,  असे सांगून अजमल यांनी ‘धर्मनिरपेक्ष शक्ती’ विजयी होतील, असा आत्मविश्वास व्यक्त केला. एआययूडीएफ धर्मनिरपेक्ष असून तसाच राहील; परंतु भाजप हा स्वत:च जातीय असून तो जातीय राजकारण करतो व याच चष्म्यातून तो सगळ्यांकडे बघतो, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Assam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१ElectionनिवडणूकBJPभाजपा