आयपीएलसाठी कर्जवापर नाही

By Admin | Updated: June 15, 2017 00:52 IST2017-06-15T00:52:52+5:302017-06-15T00:52:52+5:30

कर्जाची रक्कम माझ्या मालकीचा आयपीएल संघ विकत घेण्यासाठी मी वळती केलेली नाही, असा दावा फरार मद्यसम्राट विजय मल्ल्याने मंगळवारी केला.

There is no loan for the IPL | आयपीएलसाठी कर्जवापर नाही

आयपीएलसाठी कर्जवापर नाही

लंडन : कर्जाची रक्कम माझ्या मालकीचा आयपीएल संघ विकत घेण्यासाठी मी वळती केलेली नाही, असा दावा फरार मद्यसम्राट विजय मल्ल्याने मंगळवारी केला.
नऊ हजार कोटी रुपयांचे बँकांचे कर्ज न फेडल्याच्या प्रकरणात त्यांच्यावर भारतात खटला सुरू आहे. मल्ल्याला चार डिसेंबरपर्यंत जामीन मंजूर असून तो मंगळवारी वेस्टमिन्स्टर न्यायालयात उपस्थित होता. तो ्म्हणाला, येथील न्यायालयात मी माझी बाजू मांडू शकलो याबद्दल मी आनंदी आहे.
कर्ज न फेडल्याचे सगळे आरोप त्याने फेटाळले. येथील ओव्हल मैदानावर चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात काही प्रेक्षकांनी मल्ल्याला ‘चोर’ म्हटले होते. तुमचे प्रश्न आवश्यक त्या वस्तुस्थितीसह असावेत नाही तर तुम्ही अब्जावधी पौंडांचे स्वप्नच बघत राहाल. वस्तुस्थिती माहीत नसेल तर तुम्ही प्रश्न विचारू नका. असंबद्ध प्रश्न विचारू नका, असे मल्ल्या म्हणाला. इंडियन प्रिमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स टीम विकत घेण्यासाठी बँकांकडून घेतलेले कर्ज वापरले का, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता.

Web Title: There is no loan for the IPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.