कोणत्याही पक्षात हस्तक्षेप करण्याचा उद्देश नाही-पाटणा हायकोर्ट
By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:17+5:302015-02-13T00:38:17+5:30
पाटणा : नितीशकुमार यांना जदयू विधिमंडळ पक्षनेते म्हणून मान्यता देण्याच्या विधानसभा सचिवालयाच्या पत्राची तपासणी करण्याचा आपला निर्णय कोणत्याही राजकीय पक्षाच्या अंतर्गत कामकाजात हस्तक्षेप करणारा नाही, असे पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एल. एन. रेड्डी आणि न्या. विकास जैन यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे.

कोणत्याही पक्षात हस्तक्षेप करण्याचा उद्देश नाही-पाटणा हायकोर्ट
प टणा : नितीशकुमार यांना जदयू विधिमंडळ पक्षनेते म्हणून मान्यता देण्याच्या विधानसभा सचिवालयाच्या पत्राची तपासणी करण्याचा आपला निर्णय कोणत्याही राजकीय पक्षाच्या अंतर्गत कामकाजात हस्तक्षेप करणारा नाही, असे पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एल. एन. रेड्डी आणि न्या. विकास जैन यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे.जदयूचे माजी मंत्री पी. के. शाही यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने आपली बाजू स्पष्ट केली. मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी ज्या नितीशकुमार समर्थक मंत्र्यांचा बडतर्फ केले आहे, त्यात शाही यांचाही समावेश आहे.